Subscribe Us

header ads

समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज यांच्या भिक्षा दौऱ्याचे पुण्यनगरीत स्वागत

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)


समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज यांच्या भिक्षा दौऱ्याचे पुण्यनगरीत स्वागत



पुणेः परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज यांच्या भिक्षा दौऱ्याचे पुणे येथे विविध ठिकाणी सद्गुरु भक्तांनी स्वागत करुन प्रतिमा,पाद्यपुजन करुन दर्शनाचा लाभ घेतला.बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील परमपुज्य समर्थ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज  संस्थान येथुन भिक्षा दौऱ्याचे आयोजन सद्गुरु सेवेकरी यांचेकडून झाले. या दौऱ्याचे पुणे उपासना मंडळ यांनी स्वागत केले.पुणे भागातीललोहगाव,विश्रांतवाडी,खराडी,मगरपट्टा,हांडेवाडी,लोणीकाळभोर,फुरसुंगी,वडकीनाला,येवलेवाडी,सुखसागरनगर,धनकवडी आदी ठिकाणी सद्गुरु भक्तांच्या निवासस्थानी या भिक्षा दौऱ्याचे नियोजन उत्कृष्ट झाले.धनकवडी भागातील आंबेगाव पठार येथील 'गाणार निवास ' येथे  स्वागत  झाले. महाराजांच्या प्रतिमा ,पाद्यपूजन बाळकृष्ण गाणार, सौ.अश्विनी गाणार यांचे हस्ते झाले.याप्रसंगी प्रामुख्याने श्रीमती पुष्पाताई गाणार, संतोष गाणार,सौ.वैशाली गाणार,सौ.नलिनी ढेकळे,प्रकाश पळसकर,सौ.सुनंदा पळसकर,सौ.शितल विसवळे,सौ.दीपा विसवळे,सौ.ज्योती 

कोळपकर,सौ.विजया नाल्टे,सागर कोळपकर आदीनी दर्शनाचा लाभ घेतला.तसेच सिने अभिनेत्री शितल ढेकळे नी देखील  दर्शनाचा लाभ घेऊन आशिर्वाद घेतले.याप्रसंगी अध्यात्मज्ञान प्रचारक मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी दर्शन घेऊन या दौऱ्याची माहिती घेऊन प्रचारसेवा   घेतली.या दौऱ्याप्रसंगी महिलांनी भजन सादर केले.श्री प्रल्हाद महाराज सोशल ग्रुपवर देखील अनेक सद्गुरु भक्तांनी पाद्यपुजा,उपासना महाप्रसाद खुप छान झाले.तसेच आमच्याकडे महाराज आले खुप समाधान झाले.अशा प्रतिक्रिया व्यक्त करुन दोन वर्षांनी हा योग आला.असाच योग पुन्हा लवकर यावा.अशी सद्गुरु चरणी अनेकांनी प्रार्थना केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा