Subscribe Us

header ads

आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे-डॉ सविता शेटे

बीड स्पीड न्यूज 

आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे-डॉ सविता शेटे


बीड प्रतिनिधी-:येथील माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागाद्वारे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता शेटे उपस्थित होत्या.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात आहार आरोग्य आणि कुपोषण या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संध्या 

आयस्कर यांनी केले.सविता शेटे यांनी आरोग्य विषयी सविस्तर मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे बालपणापासून पालखी मुलांना याबाबत सांगत असतातच पण तोरणासारख्या महामारी च्या काळात आपण देखील सर्वांनी वारंवार हात धुणे तोंडाला मास्क लावणे सामाजिक आंतर पाने या सर्व बाबी कडे लक्ष देत आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.जागतिक आरोग्य दिनानिमित्त गृह विज्ञान विभागात आहार आणि आरोग्य समतोल आहार कुपोषण कुपोषणाचे परिणाम 

आरोग्यदायी टिप्स वयोगटानुसार आहार आरोग्याचा मूलमंत्र फास्ट फूड चे दुष्परिणाम सुरुवातीपासून स्मार्ट आहात या विविध विषयांवर पोस्टर मधून जनजागृती करण्याचे काम तसेच माहिती देण्याचे काम करण्यात आले या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला असून या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियंका आतकरे या विद्यार्थिनीने केले.कार्यक्रमास विद्यार्थिनी,प्राध्यापक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा