Subscribe Us

header ads

मा.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने आत्मलिंग शेटे सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


मा.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने आत्मलिंग शेटे सन्मानित

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):-परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या पत्रकार व संपादकांचा गौरव केला जातो.यंदा या जीवन गौरव पुरस्कारासाठी परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. रविवारी, दि.10 एप्रिल 2022 रोजी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांना संपत्नीक स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देवून जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार येथील गेली 30 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत कार्य करणारे, सत्य व परखडपणे आपले विचार जनसामान्यापर्यंत आपल्या परळी समाचार वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यक्त करणारे तसेच शोध पत्रकारितेमधून अन्याविरुद्ध आवाज उठवणारे असे संपादक आत्मलिंग शेटे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे जेष्ठ संचालक विकासराव डुबे, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, डॉ.अरुण गुट्टे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे शहराध्यक्ष जगदीश शिंदे, तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, पत्रकार प्रशांत जोशी, सतिश बियाणी, लक्ष्मण वाकडे, बालसाहेब कडबाने, धनंजय आरबुने, ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, राजेश साबणे, अनुप कुसुमकर, अनंत कुलकर्णी, बालासाहेब फड, सुकेशनी नाईकवाडे, धिरज जंगले,  यांच्यासह पत्रकार बांधव, नागरिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा