Subscribe Us

header ads

जेसीबीने स्वच्छता करतांना भिंत पडुन सात वर्षीय मुलीचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


जेसीबीने स्वच्छता करतांना भिंत पडुन सात वर्षीय मुलीचा मृत्यू

माजलगाव प्रतिनिधी-:जेसीबीने स्वच्छता करतांना भिंत पडुन सात वर्षीय मुलगी दबली -- मज्जीद परीसरात घाण नसतांना चालु होती स्वच्छता माजलगाव येथील नगरपालिकेकडून ईद निमित्त मज्जीद परिसर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या जेसीबीमुळे भिंत पडल्याने सात वर्षीय मुलगी या खाली दबल्याने तिचे निधन झाले ही घटना गुरूवारी 4 वाजता घडली. विशेष म्हणजे मज्जीद परिसरात घाण नसताना देखील जीसीपी का पाठवण्यात आली याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. माजलगाव शहराच्या मधोमध इदगा मोहल्ला असून या ठिकाणी एक मोठी मज्जीद आहे. या मज्जीद परिसरात कसल्याच प्रकारची घाण नसताना व ही जेसीबी आत मध्ये जात नसताना ही जेसीबी जबरदस्तीने आत मध्ये घालण्यात आली. सदरील जेसीबी मज्जीद समोरील भागात असलेल्या भिंतीजवळ गेली असता त्या ठिकाणची भिंत जेसीबीमुळे पडली. ही भिंत पडली तेव्हा त्या रस्त्यावरून सय्यद इक्रा सय्यद निसार ( वय 7 ) ही मुलगी जात असताना तिच्या अंगावर भिंत पडली. त्यामुळे ती जागीच दबली ही बाब जेसीबी चालवणाऱ्या लक्षात आल्याने त्याने जेसीबीचे खो-याने पडलेली भिंत अलीकडे घेत असताना सदरील खोरे हे मुलीला लागण्याने तिचा चेंदामेंदा झाला. ही बाब लक्षात येताच सदरील जेसीबी चालक पळाला व तो का पडत आहे. हे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सदरील मुलगी मयत झाल्याचे दिसून आले. यानंतर संतप्त जमावाने या सर्व काचा फोडल्या. -------- आत्तापर्यंत या मज्जीद कधीही घाण झाली नाही व स्वच्छता करण्यासाठी याठिकाणी कोणाची गरज नसताना जेसीबी पाठवुन स्वच्छता केलेली दाखवुन मोठ्या प्रमाणात बील उचलण्याचा डाव असल्याचा आरोप याठिकाणी केला जात होता. ------- सदरील जेसीबी ही येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या भावाची असल्याचे याठिकाणी बोलले जात होते.या घटनेनंतर न.प.चे मुख्याधिकारी व अभियंत्याचे फोन बंद येत होते. ------- सदरील जेसीबी याठिकाणी का पाठवण्यात आली व ही जेसीबी कोणाची आहे. ही माहिती घेण्यात येईल ----निलम बाफना , प्रशासक नगरपरिषद माजलगाव

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा