Subscribe Us

header ads

परिवर्तनाच्या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ जयभिम महोत्सव : डॉ.नेत्रपालसिंग यांनी व्यक्त केली भूमिका

बीड स्पीड न्यूज 


परिवर्तनाच्या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ
जयभिम महोत्सव : डॉ.नेत्रपालसिंग यांनी व्यक्त केली भूमिका



बीड / प्रतिनिधी-:आजघडीला परिवर्तनाच्या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ आहे. कारण अस्वस्थ व्हावं असं आपलं सामाजिक वास्तव आहे. कधी नव्हे इतकी कडवी आव्हानं आज परिवर्तनाच्या चळवळीसमोर, आंबेडकरी चळवळीसमोर उभी आहेत. या सगळ्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागणार आहे; गरज पडली तर आत्मटीकाही करावी लागणार आहे. आपल्यावर, आपल्या चळवळीवर अभ्यासपूर्वक लिहिणारे-बोलणारे हवे आहेत.अशी भूमिका डॉ. नेत्रपालसिंग  यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शनिवार (ता.९) आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत डॉ.नेत्रपालसिंग उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची उपस्थिती होती.उपस्थितांना संबोधित करताना डॉ.नेत्रपालसिंग म्हणले की,आंबेडकरी चळवळीला पुढे न्यायचे असेल तर कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. गेल्या अर्धशतकामध्ये आंबेडकरी चळवळ म्हणजे काय तर, राजकीय चळवळ- राजकारण करायचं! पक्षीय राजकारण करायचं, निवडणुकांचं राजकारण करायचं, सत्तेचं राजकारण करायचं, तडजोडीचं राजकारण करायचं! मात्र तडजोडी करताना जी फरफट होते आहे, त्याच्याबद्दल आत्मटीका करायची नाही. असं काहीएक समीकरण झालेलं आहे. हे अर्थातच बरोबर नाही. हे एकतर्फी आहे. आंबेडकरी 

चळवळीसमोरची आव्हानं समजून घेताना अगोदर बाबासाहेब समजून घ्यावे लागतात. बाबासाहेबांनी कोणकोणत्या क्षेत्रांत काम केलं, ते समजून घ्यावं लागतं.बाबासाहेबांच्या कामाचा विस्तार फार मोठा होता. पण, कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टींमधून सोईचा अर्थ काढला. ‘‘तुम्ही सत्ताधारी झाल्याशिवाय कोणतेही प्रश्न सोडवू शकणार नाही’’, असं बाबासाहेब म्हणाले, ते खरंच आहे. पण त्याचा अर्थ केवळ राजकारण केलं पाहिजे, असा होत नाही. राजकीय सत्ता बाबासाहेबांना अभिप्रेत होतीच, पण इतर सत्ता त्यांना फार महत्त्वाच्या वाटत होत्या. असं मत डॉ, नेत्रपालसिंग यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांसाठी ज्ञानाचा आदर्श महासागर आहेत. त्यांच्या जन्माने या देशात महान अशी क्रांती झालेली आहे, असे मत सुनिल  लांजेवार यांनी व्यक्त केले. या व्याख्यान मालेचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप रोडे यांनी केले. सूत्रसंचालन दयानंद सरपते, आभार संतोष गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्यासहआंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा