Subscribe Us

header ads

सिल्वर ओक वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आंदोलन; आ.क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड स्पीड न्यूज 


सिल्वर ओक वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आंदोलन
आ.क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खा.शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर दि.8 एप्रिल रोजी एस.टी.कामगारांनी निदर्शने करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नुसत्या निदर्शनांवरच न थांबता त्यांच्या घरावर दगडफेक करत भ्याड हल्ला केला या घटनेचा जाहीर निषेध करत आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार (दि.8) रोजी बीडमध्ये आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.दि.8 एप्रिल रोजी एस.टी. कामगारांनी राष्ट्रवादी 

काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा  खा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर निदर्शने करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. केवळ निदर्शनांवरच न थांबता त्यांच्या घरावर दगडफेक व चप्पल फेकल्या.  ही बाब अतिशय निदंनीय असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना यापुर्वी कधीच घडली नव्हती. आपल्या देशामध्ये लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी मोर्चे आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतू कोणाच्या तरी सांगण्यावरून अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणे हे महाराष्ट्रातील कोणत्याही घटकाला शोभणारे नसून सदर घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. तरी आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. या हल्ल्यामागील सुत्रधारांचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांच्या कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन 

देवून करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्याफिती लावत या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त केला. हे निवेदन देतांना आ.संदीप क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, मदन जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, बाजीराव बोबडे,हेमाताई पिंपळे,प्रज्ञा खोसरे,राणी बेग,कमलताई निंबाळकर, विद्याताई जाधव, वाघमारे ताई,नगरसेवक रमेश चव्हाण, अशफाक इनामदार, जीवन जोगदंड, बाळासाहेब गुजर, पंकज बाहेगव्हाणकर, करण चौहाण, रितेश ठाकूर, खुर्शीद आलम, लक्ष्मण ईटकर, सचिन सोनवणे, सचिन पवार, अजय सुरवसे, जयमल्हार बागल, अशोक रोमण, राजु महुवाले, शाहेद पटेल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा