Subscribe Us

header ads

अपघात होऊन गंभीर अवस्थेत पडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी; प्रहारचे जिल्हा सरचिटणीस आणी पत्रकार आले धावून

बीड स्पीड न्यूज 

अपघात होऊन गंभीर अवस्थेत पडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी; प्रहारचे जिल्हा सरचिटणीस आणी पत्रकार आले धावून
   
‌बीड/प्रतिनिधी/धारुर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूच्या अवघड वळणाच्या रस्त्यावर  अपघात होऊन या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला दोन व्यक्ती अतिशय बिकट अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात असलेले पडलेले होते हा ‌अपघात दोन दुचाकींचा झाल्याचे समजते.अज्ञात दुचाकी स्वार रस्त्यावर पडलेल्या दुचाकीला धडक मारून धारुरघाटाकडे पळ काढला असल्याचे अपघात झालेल्या एका व्यक्तीकडून समजले आरणवाडी साठवण तलावाजवळील दुचाकी स्वर रस्त्या लगत पडलेले होते या दोन‌ व्यक्ती बिकट अवस्थेत पडलेले दिसले.आणी त्या ठिकाणी कोनीही त्यांच्या जवळ दिसत नव्हते. धारुर येथील काम आटपून या रस्त्यावरून गावाकडे जात असतांना हा प्रकार दिसताच या ठिकाणी  पत्रकार गोवर्धन बडे व प्रहारचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे यांनी गाडी थांबवली.व तेथे गेले असता त्यांनी त्या दोन्ही व्यक्तींना उठवून बसवले.त्यांची अवस्था खुप भयांनक झाली होती. एका व्यक्तींच्या हाताला भयांनक असा मार लागलेला.व दुसर्या व्यक्तींच्या  डोळ्याला व पुर्ण अखावर भयानक असा मार लागलेला पाहुन लगेचच १०८ या क्रमांकावर ऍम्ब्युलन्स ला कॉल करून बोलवून घेतली आणी त्यांना धारुर ग्रामीण रुग्नालयात पाठवून दिले.व एक जणांच्या घरी कॉल द्वारे घरी माहीती दिली.अपघातात दुखापत झालेल्या एका व्यक्तींने सांगितले कि डिस्कव्हर मोटर सायकल नं.77 होता त्या व्यक्तींने उडवून तो व्यक्ती निघून गेला.किल्ले धारूर घाटातील अपघातांची मालिका कायम चालूच आहे.किल्ले धारुर तालुक्यातील "धारूर घाट का मृत्यूचा सापळा" बनला असून या घाटांमध्ये कायमच अपघात होत असतात रखडलेला रुंदीकरणाचा प्रश्न व आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूला अतिशय अवघड वळणाचा रस्ता या रस्त्यावर शनिवार रोजी हा दुचाकीला अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.हा धारूर घाटातील रुंदीकरणाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा