Subscribe Us

header ads

थरार! भरधाव कारने चौघांना चिरडले तीन ठार; एक गंभीर

 बीड स्पीड न्यूज 


थरार! भरधाव कारने चौघांना चिरडले तीन ठार; एक गंभीर


अंबाजोगाई-: रस्त्याच्या कडेला बोलत उभे असलेल्या चौघांना अंबाजोगाईच्या दिशेने आलेल्या भरधाव कारने चिरडल्याची घटना घाटनांदुर ( ता. अंबाजोगाई ) येथे सोमवारी ( दि. ४ ) रात्री १० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. यामध्ये दोघे जागीच ठार तर एकाचा लातूर येथे घेऊन जाताना रस्त्यात मृत्यू झाला. एक जण गंभीर असून कार मधील दोघे जखमी आहेत.वैभव सतीश पुरी( वय १७ वर्ष ) लहू बबन काटुळे ( वय ३० वर्ष ) असे जागीच ठार झालेल्या दोघांची नावे असून, रमेश विठ्ठल फुलारी ( वय ४७ ) असे लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झालेल्या जखमीचे नाव आहे.‌ तसेच उध्दव निवृत्ती दोडतले हे गंभीर जखमी आहेत. हे चौघेही सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे होते. यावेळी अंबाजोगाईच्या दिशेने कार क्रमांक एम.एच. २४ व्ही २५१८ ही भरधाव वेगाने आली. चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती सरळ या चौघांवर येऊन धडकून शंभर फूट फरफटत नेले. पुढे विद्युत खांबाला धडकून कार थांबली. अपघात घडताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु वैभव गिरी व लहू काटुळे हे जागीच ठार झाले होते तर रमेश फुलारी आणि उध्दव दोडतले हे गंभीर जखमी होते. या दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे जाताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका अपघाताने तिघांचा बळी गेला आहे. दोडतले हे गंभीर जखमी आहेत. तसेच कार मधील दोघे जखमी आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून यातून अपघाताची भीषणता लक्षात येते. कारचा वेगही इतका होता की, कार विद्युत खांबाला जाऊन धडकल्याने तो खांब पुर्ण वाकला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा