Subscribe Us

header ads

नवी मुंबई सुवर्णकार युवा मंडळाचा "आँनलाईन गुगल नवी मुंबई सुवर्णकार समाज बांधवाचा नाव नोंदणी "उद्घाटन सोहळा संपन्न.....!

बीड स्पीड न्यूज 


नवी मुंबई सुवर्णकार युवा मंडळाचा "आँनलाईन गुगल नवी मुंबई सुवर्णकार समाज बांधवाचा नाव नोंदणी "उद्घाटन सोहळा संपन्न.....!
युवा मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.... अध्यक्ष संजय खरोटे यांचे प्रतिपादन.

रविवार दि.३ एप्रिल नवी मुंबई सुवर्णकार मंडळ,(वाशी,नवीन पनवेल) अंतर्गत नवी मुंबई सुवर्णकार युवा मंडळ आयोजित "आँनलाईन गुगल "नवी मुंबई सुवर्णकार समाज बांधव नाव नोंदणी" उद्घाटन सोहळा शनिवार दि.२ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाज कार्यालय, सेक्टर वन/एस, शबरी हाँटेल जवळ, नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश थोरात यांनी केले यावेळी आँनलाईन फाँर्म विषयी थोडक्यात माहिती आपल्या प्रास्ताविकात सांगितली.कार्यक्रमाची सुरुवात शोभा यात्रेने ढोलताशांच्या गजरात धुमधडाक्यात करण्यात आली."संत नरहरी महाराज", "जय शिवाजी,जय भवानी"च्या गजरात परिसर दुमदुमला होता. यावेळी महिला/पुरुष, लहान मुलांनी भगवे फेटे,  पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. पारंपरिक फुगडी, भगवा झेंडा हातात घेऊन नाचणे, ढोलताशां इ. शोभा यात्रेची मुख्य आकर्षण होते.मंडळाचे अध्यक्ष श्री संजय गजानन शेठ खरोटे सहपत्नीक सौ.प्रतिभा संजय खरोटे यांच्या शुभ हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून  हिंदू नववर्ष "गुढी" उभारुन पुजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री संजय खरोटे यांनी "आँनलाईन गुगल नवी मुंबई सुवर्णकार समाजबांधव नाव नोंदणी फाँर्म "चे आँनलाईन स्वतःचा फाँर्म भरून उद्घाटन करण्यात केले.उपस्थित समाज बंधूभगिनींनी आपले आँनलाईन फाँर्म भरून घेतले. सर्व समाज बांधवाना   आँनलाईन गुगल फाँर्म लिंक या माध्यमातून पाठविण्यात आली.यावेळी मंडळाचे सचिव हेमकांत सोनार,कोषाध्यक्ष विजय भामरे साहेब, मंडळाचे कार्याध्यक्ष दादासाहेब 

धनराज जी विसपुते ,महिला मंडळ अध्यक्षा सौ. संगिताताई विसपुते,युवा अध्यक्ष ऋषिकेश थोरात,तसेच कार्याध्यक्ष प्रा. शांताराम सोनार सर, उपाध्यक्ष श्री पुंजाराम शेठ थोरात आणि श्री प्रविण भामरे, सहसचिव मनोज सोनार,दिपक वाघ, सहकोषाध्यक्ष पंकज पोतदार,मंडळाचे जेष्ठ सदस्य श्री छोटूलाल मोरे,संस्थापक सदस्य अशोक शेठ विसपुते, नेरकर तसेच युवा मंडळ, महिला मंडळ तसेच समाज बाधवांच्या उपस्थितीत करण्यात आले. युवा मंडळाचे सचिव तुषार भामरे यांनी नोंदणी फाँर्म विषयी नोंदणी फाँर्म  काँप्युटर तसेच मोबाईल फोन  अँपच्या माध्यमातून उदा .नाव, गाव, पत्ता, व्यवसाय/नोकरी,शिक्षण इ.माहिती फाँर्म भरण्या विषयी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले सांगितले.मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे यावेळी म्हणाले की, युवा मंडळाने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन समाजपयोगी उपक्रम हाती घेऊन समाज बांधवाची कुटुंब नामावली एकत्र करून डिजिटल आँनलाईन फाँर्म भरुन सुवर्णकार बांधवांची नाव नोंदणी अँपच्या माध्यमातून एकत्र करण्याचे महत्त्व पुर्ण कामाबद्दल युवा मंडळाचे भरभरून कौतुक केले.यामध्ये नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका क्षेत्र, रायगड जिल्हा समाज बांधवाचा समावेश असेन ,यासाठी आपण आपल्या व्हाट्सएपच्या मोबाईल/काँप्युटर च्या माध्यमातून नाव नोंदणी घरी बसून करु शकता. संपूर्ण डाटा एकत्रितपणे संकलित करण्यात येईल असे सांगितले. यावेळी समाज बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा सौ. संगिताताई धनराज विसपुते यांनी युवा मंडळाचे भरभरून कौतुक केले.गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मंडळाने आँनलाईन नाव नोंदणी हा उपक्रम समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. यासाठी सर्व समाज बांधवांनी आपली आँनलाईन अँँपच्या माध्यमातून नाव नोंदणी करावी.यावेळी असे आवाहन केले.सदर कार्यक्रमात युवा/युवतींचा ओळख परिचय करण्यात आला.युवा मंडळ अक्षय भामरे यांनी नाव नोंदणी तसेच सुवर्णकार महिला मंडळाने  शोभा यात्रा नियोजनाची जबाबदारी पार पाडली. महिला मंडळाच्या सौ.सुधा अभिजित जडे यांनी  "गुढीपाडव्याचे महत्त्व" या विषयी 

माहिती सांगितली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय गजानन खरोटे ,खजिनदार विजय भामरे, धडाडीचे कार्यकर्ते छोटुलाल मोरे, यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन व नियोजन केले. युवा अध्यक्ष ऋषीकेश थोरात, सचिव तुषार भामरे, अभिजीत जडे.  राहुल पोतदार , प्रतीक विभांडिक ,अक्षय भामरे  ,हिमांशू जडे,सौरभ जडे,  यश विसपुते प्रयत्न केले .महिला मंडळातर्फे ,सौ.भारती पोतदार, सौ.सारिका बिरारी, सौ.निशा मोरे सौ.मनिषा विसपुते, सौ.योगिता भामरे, सौ.प्रतिभा खरोटे,सौ. रेखा भामरे, सौ.रत्ना भामरे, सौ.पुजा पिंगळे, सौ.गायत्री सोनार, सौ.आशा दुसाने,सौ.सोजल पोतदार, कु.मानसी दुसाने, कु. दिक्षा सोनार, आदी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तसेच, दिलीप विसपुते, यशवंत भामरे, दिपक पिंगळे, यशवंत भामरे, किशोर वडनेरे आदी मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.कार्यक्रमाची फोटोग्राफी युवा सचिव तुषार भामरे यांनी केली. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.शांताराम सोनार सर यांनी केले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा