Subscribe Us

header ads

बेलगावकरांना ७० वर्षानंतर डांबरी रस्ता; जिपसदस्य राजेंद्र मस्के जिल्हा नियोजन समितीतुन निधी, सरपंच अश्विन शेळके यांची प्रत्यक्ष कामावर देखरेख:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड स्पीड न्यूज 


बेलगावकरांना ७० वर्षानंतर डांबरी रस्ता; जिपसदस्य राजेंद्र मस्के जिल्हा नियोजन समितीतुन निधी, सरपंच अश्विन शेळके यांची प्रत्यक्ष कामावर देखरेख:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
____
बीड प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील ईश्वर भारती बेलेश्वर महाराजांच्या  पावनभुमीत मौजे बेलगाव येथील ग्रामस्थांना तब्बल ७० वर्षानंतर डांबरीकरण होत असलेला रस्ता मिळाला असुन गावचे सरपंच अश्विन शेळके प्रत्यक्ष कामावर देखरेख करत रस्ता उत्कृष्ट प्रतीचा व्हावा यासाठी प्रयत्नशील असताना दिसुन येतात. 

प्राजिमा ११५ ते बेलगाव रस्ता, व्ही. आर.१०५,किलोमीटर  ०/०० ते ०/६०० ,अंदाजे किंमत १५ लाख, ३३ हजार रूपये आहे. 

७० वर्षानंतर गावाला रस्ता, जिल्हापरीषद सदस्य राजेंद्र मस्के , जिल्हा नियोजन समितीतुन निधी दिला:-सरपंच बेलगाव अश्विन शेळके 
_____
७० वर्षापासून बेलगावला डांबरीकरण रस्ताच नव्हता लिंबागणेश जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र मस्के यांनी जिल्हानियोजन समितीच्या निधीतुन अंदाजे १५ लाख रूपये किंमतीचा निधी दिला असून रस्त्याचे काम उत्कृष्ट व्हावे यासाठी जातीने हजर राहुन काम करून घेत आहे. 

गावातील रस्ते उत्कृष्ट होण्यासाठी सरपंच, ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी:-डाॅ.गणेश ढवळे 
____
ग्रामिण भागातील दळणवळणाची साधने म्हणून करण्यात येत असलेली रस्ताकामे आधिकारी आणि ठेकेदार संगनमतानेच निकृष्ट दर्जाची करून आर्थिक गैरव्यवहार करत आहेत त्यामुळेच गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी निकृष्ट रस्ता झाल्यानंतर शासन दरबारी तक्रारी करण्याऐवजी रस्ता सुरू असतानाच रस्त्याच्या कामावर देखरेख करत लक्ष ठेवुन चांगले काम करून घेणे आवश्यक आहे. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा