Subscribe Us

header ads

सामाजिक बांधिलकी जोपासणारा.. कोरोना योध्दा.! उमेश उर्फ बाळूशेठ पवार....वाढदिवसाच्या निमित्ताने.. शब्दांकन:हेमकांत सोनार

बीड स्पीड न्यूज 

सामाजिक बांधिलकी जोपासणारा.. कोरोना योध्दा.!
 उमेश उर्फ बाळूशेठ पवार....वाढदिवसाच्या निमित्ताने..
      शब्दांकन:हेमकांत सोनार

अलिबाग प्रतिनिधी-:समाज सेवा हीच ईश्वर सेवा समजून कोविड कोरोना काळात सामाजिक बांधिलकी ठेवून समाज सेवेचे व्रत घेतलेले उमेश सखाराम पवार म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वाचे लाडके मित्र बाळूशेठ पवार. निमित्त होते वाढदिवसाचं.एक साधा भोळे व्यक्ती मक्त तसेच अलिबागचे लोकप्रिय नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक यांचे खंदे समर्थक, पाठीराखा म्हणजेच बाळूशेठ पवार.या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक बाळूशेठ पवार यांचा अलिबागच्या उपनगराध्यक्षा मा. सौ.मानसीताई म्हात्रे यांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्ताने "कोरोना योध्दा" म्हणून सत्कार करण्यात आला. कोविड कोरोना काळात जर आपल्या ओळख परिचयातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे कळल्यावर तात्काळ मदतीला धावून जाणारे म्हणजे बाळूशेठ पवार. कोरोना काळात कोविड ची लागण झाल्यास त्या परिवारासाठी मदतीला धावून जाणे तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपुस करून धीर देणे परिवारासाठी राशन,भाजी पाला, दुध अंडी इ.न चुकता काळजीने घरपोच करणे. हे मुख्य काम त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या काळात केले.मी जेव्हा कोविड ने आजारी होतो ,हे समजल्यावर त्यांनी  सतत चार दिवस माझ्या घरी दुध,अंडी, भाजी पाला इ.न चुकता पाठवले.हे मी व माझ्या परिवारातील स्मरणात नेहमी राहिल .चांगल्या प्रसंगात सर्वच धावून येतात पण या जीव घेण्या कोरोना कोविड च्या काळात बरेच नातेवाईक /शेजारी- पाजारी जरी अगदी जवळचा नातेवाईक असला तरी मदतीला येत नव्हते, कारण कोविड कोरोनाची भिती एवढी जनमानसात पसरली होती कि,कोरोना कोविड चाचणी पाँझिटिव्ह आली म्हणजे तो कायमचा संपला अशी भिती/गैरसमज  जनमानसावर झाला होता. पण बाळूशेठ यांनी कोणतीही जीवाची पर्वा न करता अलिबागचे मा.नगराध्यक्ष प्रशांतशेठ नाईक यांच्या सहकार्याने सर्वोतोपरी मदत जनमानसापर्यत पोहचवली. हे आज अलिबाग कर म्हणून कोणीही विसरू शकत नाही. समाज कार्याचा वसा त्यांच्या रक्तात भिनलेला आहे.जो पर्यंत पेशंट पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत त्या परिवाराची काळजी घेणे हा मुख्य स्वभाव.  कोविडची लस आपल्या मतदार संघ/वार्डात कुणी घेतली अथवा न घेतली असल्यास फोनद्वारे संपर्क साधून सर्वोतोपरी मदत करणे ,हा जणू गुणधर्मच.समाज कार्याचा हा मुळ वारसा मिळाला तो त्यांची आई सौ. आक्का आणि वडील श्री सखाराम आण्णा पवार यांच्या प्ररणेमुळेच ,तसेच परिवारातील सर्वाचे सहकार्य असल्यामुळे हे कार्य करत असतो ,असे ते नेहमी सांगतात.दि.१० एप्रिल हा बाळूशेठ यांचा वाढदिवस.  स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाद्वारे प्रभाकर पाटील सार्वजनिक 

वाचनालय,अलिबाग येथे त्यांचा छोटे खानी समारंभात वाढदिवस तसेच कोविड काळात त्यांनी जनतेला केलेली मदत या निमित्ताने शुभेच्छापर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी अलिबागच्या मा.उपनगराध्यक्षा सौ.मानसीताई म्हात्रे ,नगरसेविका श्रीमती वृषाली ताई ठोसर, नगरसेवक राकेश चौलकर,अलिबागचे नगराध्यक्ष यांच्या वतीने त्यांचे स्विय सहाय्यक संजय कांबळे हे यावेळी नगराध्यक्ष यांच्या वतीने तसेच उपनगराध्यक्षा सौ.मानसीताई म्हात्रे यांनी बाळूशेठ यांचा पुष्षगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  शुभेच्छा देण्यासाठी मंचाचे सल्लागार श्रीरंग घरत,माजी नगरसेवक आर.के.घरत, नाट्यकर्मी जगदीश नागे,सौ.व श्री विकास पाटील,नंदू तळकर, विनोद टेंबुलकर, अँड. राजेंद्र जैन मंदार कुलकर्णी आदी यावेळी आर्वजून उपस्थित होते.आपल्या भाषणात मा.उपनगराध्यक्षा सौ.मानसीताई म्हात्रे, म्हणाल्या कि, बाळूशेठ यांनी कोरोना काळात जनतेला केलेली मदत अलिबागकर नेहमी स्मरणात ठेवतील. यासाठी त्यांनी जीवाची कोणतेही पर्वा न करता ते स्वतः तसेच सहकार्यामार्फत हाँस्पिटल मध्ये अँडमिट पेशंट साठी मदत पोहचविण्याचे काम त्यांनी यावेळी केली ."कोरोना योध्दा" म्हणून अलिबागकरांच्या मनात नेहमी ओळख राहील.त्यांच्या हातून अशाप्रकारचे समाजपयोगी कार्य घडत राहो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे सर्वोसर्वा नागेश कुलकर्णी यावेळी म्हणाले की,बाळूशेठ यांनी माझा परिवारील जेव्हा कोविड कोरोनाने आजारी होते तेव्हा त्यांनी केलेली मदत नेहमी स्मरणात राहील.सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी सर्वोतोपरी समाजासाठी तसेच मी व माझ्या परिवारासाठी मदत केली.यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव केला. साप्ता.कुलाबा वैभव संपादक श्री बळवंत वालेकर सर म्हणाले की,  बाळूशेठ यांनी कोविड काळात जनतेला केलेली मदत ही अलिबाग कर  कुणीही विसरू शकणार नाही, कारण ही त्यांना ईश्वरी देणगी आहे. त्यांच्या कार्याचा गोरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री उल्हास पवार यांनी बाळूशेठ यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा