Subscribe Us

header ads

पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांनी धारूर येथील एसबीआय बँकेकडे लक्ष देण्याची नागरीकांची मागणी; एसबीआय शाखा व्यवस्थापक यांच्याकडून शेतकर्यांना उडवा उडवी ची उत्तरे

बीड स्पीड न्यूज 


पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांनी धारूर येथील एसबीआय बँकेकडे लक्ष देण्याची नागरीकांची मागणी
                                                                                  एसबीआय शाखा व्यवस्थापक यांच्याकडून शेतकर्यांना उडवा उडवी ची उत्तरे                                                                                                                                                  बीड/प्रतिनिधी/धारुर तालुक्यातील एसबीआय शाखा येथे अनेक दिवसापासुन कर्ज प्रकरण फाईली तसाच कपाटामध्ये  ठेवलेल्या दिसुन येत आहेत.कर्ज प्रकारणाच्या फाईली किमान एक ते दिड वर्षापासुन तसाच बॅंकेमध्ये आहेत.व शाखा व्यवस्थापक यांच्याकडून गोरगरीब शेतकर्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.तसेच काही नवीन योजना विचारल्या असता मला काही माहीत अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.व्यवस्थापक तर आयटीआर च तीन ते चार वर्षाचा मागत आहेत.असे अनेक नवीनच प्रश्न विचारत असुन त्या दारातूनच धारुर येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक अनेक व्यक्तींना टोलवा टोलवीची कारणे देत आहेत.भाषा सुद्धा वेगळी वापरली जात आहे.अशा या उडवा उडवीच्या उत्तरामुळे किल्ले धारुर तालुक्यातील गोरगरीब शेतकरी चांगलेच वैतागून गेलेले दिसुन येत आहेत.तरी कर्ज प्रकरण फाईली कधी होतील का निसते एसबीआय बँकेमध्ये निसते फेटे मारावे लागतील असा हि प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.तरी धारुर येथील एसबीआय शाखेकडे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा