Subscribe Us

header ads

पवित्र रमजना महिन्यात ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळा संपेपर्यंत लोडशेडिंग बंद करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांची मागणी

बीड स्पीड न्यूज 

पवित्र रमजना महिन्यात ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळा संपेपर्यंत लोडशेडिंग बंद करा 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांची मागणी


बीड प्रतिनिधी-:सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्याचबरोबर उन्हळा सुरु असल्याने उन्हाच्या तिव्रतेने उष्णतेमध्ये वाढ होत आहे. गरमीच्या उकाड्याने नागरिक, विद्यार्थी परेशान होत आहेत. अशातच महावितरणकडून बीड जिल्ह्यामध्ये लोडशेडींग सुरू करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड अडचणी व त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात महिनाभर साजरा केला जात आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास लोडशेडींगमुळे अडचणी निर्माण होत असून लोडशेडींगमुळे शहरी व ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.तरी, बीड जिल्ह्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेता मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान सणामध्ये तसेच घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव कार्यक्रम व उन्हाळा संपेपर्यंत लोडशेडींग बंद  करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, मा.ना. अजितदादा पवार साहेब यांना आ. संदीप क्षीरसागर यांनी दिले.यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील साहेब, पालकमंत्री मा. ना. धनंजयजी मुंडे साहेब, मा. आ. संजयजी दैंड, मा. सय्यदजी सलीम साहेब, मा. अशोक आबा डक, मा. जिल्हाध्यक्ष राजेश्र्वरजी चव्हाण आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा