Subscribe Us

header ads

महिलांच्या कलागुणांना स्पर्धेतून मिळाली संधी; जयभिम महोत्सव : जवळपास दीडशे मुली-महिलांनी स्पर्धेत घेतला सहभाग

बीड स्पीड न्यूज 

महिलांच्या कलागुणांना स्पर्धेतून मिळाली संधी; जयभिम महोत्सव : जवळपास दीडशे मुली-महिलांनी स्पर्धेत घेतला सहभाग

बीड / प्रतिनिधी-:अवघ्या राज्याला आदर्श घालून दिलेल्या बीडच्या जय-भीम महोत्सवात शुक्रवार (ता.8) एप्रिल रोजी संगीतखुर्ची, रांगोळी, वेशभूषा आणि गेमशो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडली. या स्पर्धेत जवळपास दीडशे मुली-महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे या स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना एक नामी संधी मिळाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या  जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार (ता.8) महिलांच्या विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घटन थतागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पफुले अर्पण करून करण्यात आली. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला स्पर्धा संयोजन समितीच्या अरूणाताई आठवले, संगीता वाघमारे, अनिता डोंगरे, आशा सरवदे, वंदना वाघमारे, मल्लिकारांणी दाभाडे, आम्रपाली निसर्गंध, मिनाक्षी देवकते, ललिता तांबारे, वंदना पंडित, लक्ष्मी सरपते, करूणाताई वडमारे, करुणा मकासरे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांनी परिश्रम घेतले. दरम्यान यावेळी रुपनंदा ग्रुपच्या महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमास काही धम्मदान देऊन एकीच्या कार्यास हातभार लावला.





असा नोंदवला स्पर्धकांनी सहभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत  50 संगीतखुर्ची 50, वेशभूषा 20 , गेमशो 40 असा एकूण 140  महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. तर सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.




आज होणार डॉ. नेत्रपालसिंग यांचे व्याख्यान


शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत डॉ. नेत्रपालसिंग दिल्ली यांचे व्याख्यान होणार आहे. सदरील व्याख्यान आंबेडकरी चळवळीतील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि वर्तमानातील भूमिका या विषयावर असणार आहे. या व्याख्यानमेलस उपस्थित रहावे असे आवाहन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.
            




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा