Subscribe Us

header ads

2021चा खरीप पिकविमा दुसऱ्या टप्प्यातील वंचित शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या- संभाजी ब्रिगेड; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

बीड स्पीड न्यूज 

2021चा खरीप पिकविमा दुसऱ्या टप्प्यातील वंचित शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या- संभाजी ब्रिगेड

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

केज/प्रतिनिधी-: केज तालुक्यातील शेतकऱ्यांना 2021 खरीप हंगामातील पीक विम्याचा अल्पसा पहिला टप्पा मिळाला आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटपात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना डावलले गेले आहे. तरी त्या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ विमा मिळावा या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.याविषयी सविस्तर वृत्त असे की, शेतकरी वर्ग निसर्गाने साथ न दिल्याने हवालदिल झाले असून यामुळे व मागील वर्षी अचानक जोराचा वारा व पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे म्हणून खरीप पिकविमा पहिला टप्पा मिळालेला असताना दुसरा टप्प्या पासून काही शेतकऱ्यांना वंचित ठेवले गेले याचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही व या विषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तरे मिळत आहेत. तरी मा. साहेबांनी आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे करिता पहिला टप्पा पीकविमा भेटलेल्या व दुसऱ्या टप्प्या पासून वंचित राहिलेल्या मागील वर्षीचा पीकविमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा वाटप करणे बाबत साबंधीतास आदेशित व्हावे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा निवेदनाद्वारे केज तहसीलदार यांना दिला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक, सचिव रामराजे गलांडे, सचिन साखरे, अजित धपाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक