Subscribe Us

header ads

दि. ११ मे २०२२ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:

बीड स्पीड न्यूज 


दि. ११ मे २०२२ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:


मागील हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यात मोठे ऊस उत्पादन (85 हजार हेक्‍टर) झाले. यामळेु निर्माण झालेल्या अतिरिक्त ऊस प्रश्नावर राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन तातडीने उपाययोजना करीत आहे

यासाठी जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन नियोजन करण्यात आलेले आहे तसेच अतिरिक्त उसाचा बाबत नियोजनासाठी साखर आयुक्त आणि विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी वेळोवेळी बैठका घेऊन उपायोजना केल्या आहेत. फेब्रुवारीपासून वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये 28 मार्च , 29 एप्रिल, २ मे या बैठका द्वारे आढावा घेऊन कार्यवाही केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे

शेतकऱ्यांनी उसाच्या प्रश्नामुळे कोणतेही चुकीचं पाऊल उचलू नये ज्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंब निराधार होते.

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव मधील ऊस उत्पादक शेतकरी स्व.  नामदेव जाधव यांच्याबाबत घडलेली  घटना  दुःखद असून त्याच्या कुटुंबास धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून स्वतः  उपस्थित राहून सांत्वन केले आहे त्यांना शासकीय मदत तातडीने व्हावे यासाठी तहसीलदार गेवराई यांना सूचित करण्यात आले आहे

एकूण 55 लाख मेट्रिक टन ऊस पैकी 
प्रत्यक्षात आत्तापर्यंत 40 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस यामध्ये साखर कारखान्यांकडे  नोंद झालेला आणि नोंद झालेला नाही असा ऊस गाळप होण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व कारखाने तसेच लगतच्या परभणी व इतर जिल्ह्यातील कारखान्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत

जिल्हाधिकारी म्हणून स्वतः श्री शर्मा यांनी प्रत्यक्ष माजलगाव व जिल्ह्यातील तालुक्यातील कारखान्यांना भेट देऊन प्रत्यक्षात माहिती व कार्यवाहीचे चा आढावा घेतलेला आहे

ऊस तोड होण्यासाठी मजूर उपलब्धता हार्वेस्टर उपलब्धता व वाढत असलेले अतिरिक्त दिवस यामुळे काहीसा अडचणी येत आहेत परंतु जिल्हा प्रशासन यादृष्टीने वेळोवेळी नियोजन करत आहे

जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून तहसीलदार यांना सदर नियोजनामध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

31 मे पर्यंत जास्तीत जास्त ऊस गाळप होण्यासाठी तातडीने पावले टाकली जात असून नंतर देखील ऊस शिल्लक राहिल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन स्तरावर विचार केला जात आहे

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये दिवसाला 27 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले जात आहे
परभणी सह बीड लगतचे जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील गाळप पूर्ण झालेल्या साखर कारखान्यांमध्ये बीड जिल्ह्यातील ऊस गाळप करणेसाठी शासनाने सूचना दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा