Subscribe Us

header ads

नामदेव जाधव आत्महत्या प्रकरणी कार्यक्षेत्रात असलेल्या कारखान्यावर गुन्हा दाखल करा - भाई मोहन गुंड

बीड स्पीड न्यूज 

नामदेव जाधव आत्महत्या प्रकरणी कार्यक्षेत्रात असलेल्या कारखान्यावर गुन्हा दाखल करा - भाई मोहन गुंड 

शेतकरी भावांनो आत्महत्या हा पर्याय नाही

गेवराई| प्रतिनिधी-: गेवराई तालुक्यातील हिंगणगाव या गावातील तीस वर्षीय तरुण नामदेव जाधव या शेतकऱ्यांनी ऊस जात नसल्याच्या नैराश्यातून ऊस फेकून देऊन शेतातील झाडाला गळफास घेऊन  आत्महत्या केली. शेतकऱ्यावर ही वेळ यावी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, किमान कारखानदारांनी शेतकऱ्यांना चार शब्द चांगले बोलून धीर द्यावा जेणेकरून आत्महत्या होणार नाहीत मात्र असे न होता मग्रूर कारखानदार शेतकऱ्याला साधा धीर द्यायला तयार नाहीत. अशाच नैराश्यातून नामदेव जाधव यांनी आत्महत्या केली. संबंधित कार्यक्षेत्रात असणाऱ्या कारखानदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केली आहे. एक तर ऊस जायला तयार नाही उसाला देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही पाणी उपलब्ध असलं तर विज पुरवठा व्यवस्थित होत नाही. ऊस तोडी ला आलेली यंत्रणा वीस ते पंचवीस हजार तोडणीसाठी मागतात पैसे द्यायचे कुठून यांना अशी कारखान्याकडून मोठ्या प्रमाणावर गोरगरीब शेतकर्‍याची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे. ही थांबावा आशी मागणी भाई मोहन गुंड यांनी केली आहे.


शेतकरी भावांनो आत्महत्या हा पर्याय नाही ऊसाची विल्हेवाट होईपर्यंत कारखाने बंद होऊ देणार नाहीत आम्ही आपल्या पाठीशी आहोत कुणाला अडचण वाटत असल्यास चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संपर्क साधा आत्महत्या करून घरादाराला उघड्यावर आणू नका अशी भावनिक आव्हान शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धिपत्रकात केले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा