Subscribe Us

header ads

एचपीएम कंपनीकडून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १६ लाखांची आर्थिक मदत!

बीड स्पीड न्यूज 


एचपीएम कंपनीकडून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १६ लाखांची आर्थिक मदत!


केज| प्रतिनिधी-: केज येथील भवानी चौकात रविवारी ( दि. ८ ) दुपारी ४ च्या सुमारास ट्रक, ट्रॅक्टर, बुलेट व एक कार असे चार वाहनांच्या विचित्र अपघाताची घटना घडली होती. यामध्ये बुलेट वरील दोन तरूण ट्रकखाली दबून ठार झाले होते. या अपघातानंतर संथ गतीने रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीवर रोष व्यक्त करण्यात आला होता. तसेच त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं म्हणून जमावाने ठिय्या आंदोलन केले होते. या एचपीएम कंपनीने प्रत्येकी ८ लाख असे दोघा मृतांच्या कुटुंबीयांना १६ लाखांची आर्थिक मदत केली. ही माहिती भ्रष्टाचार निर्मूलनचे सादेख इनामदार यांनी दिली.अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गाचे मागील दोन वर्षांपासून एचपीएम कंपनीचा संथ गतीने काम सुरू आहे. केज शहरातील जाणारा रस्ताही खोदून ठेवलेला असून, भवानी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक दोन्ही चौकातील काम पुर्ण झालेलं नाही. त्यामुळे येथे अपघाताच्या घटना घडत आहेत. रविवारी ( दि. ८ ) दुपारी ४ वाजता ऊस घेऊन धारुर कडून आलेल्या भरधाव ट्रकने अंबाजोगाईच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. नंतर तो पलटी होऊन बुलेटवर कोसळला. बुलेट ट्रकच्या खाली आल्याने त्यावरील शेख जुबेर, कुरेशी शहेबाज हे दोघं जागीच ठार झाले होते. यानंतर संतप्त जमावाने मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं म्हणून ठिय्या आंदोलन केला होता. जमावाची भावना ऐकून एएसपी पंकज कुमावत यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर जमाव शांत झाला व आंदोलन मागे घेण्यात आले होते. सोमवारी ( दि. ९ ) एचपीएम कंपनीनेही घटनेचं गांभीर्य ओळखून दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. प्रत्येकी ८ लाख असे १६ लाख रुपये दिले जाणार आहेत. सोमवारच्या तारखेत कुटुंबियांच्या नावे धनादेश ( चेक ) तयार झाले आहेत. ते बाय पोस्ट कुटुंबियांच्या नावे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती सादेख इनामदार यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा