Subscribe Us

header ads

परळीत किरकोळ वादातुन धारदार शस्त्राने एकाचा खून

बीड स्पीड न्यूज 


परळीत किरकोळ वादातुन धारदार शस्त्राने एकाचा खून


परळी | प्रतिनिधी-:किरकोळ वादातुन अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरच तरुणास धारदार शस्त्राने मारहाण करत खुन केल्याची घटना काल 7:30 च्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.सायंकाळी गणेशपार हनुमान नगर भागात झालेल्या हाणामारीत शैलेश राजनाळे (वय 23) राहणार नांदूर वेस या युवकाचा मृत्यू झाला होता.शैलेश राजनाळे हा युवक सायंकाळी घरातून बाहेर येत असताना अंधाराचा फायदा घेत 2 ते 3 जणांनी त्याच्यावर  धारधार शस्त्राने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले होते.घटनास्थळी परळी शहर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन जखमी शैलेश राजनाळे याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले होते.
पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे समोर आले असून रात्री उशिरा त्याच गल्लीतील एका तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.शैलेश सुरेश राजनाळे (वय 28, रा. नांदूर वेस गल्ली, परळी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. शैलेशच्या कुटुंबाचा वैद्यनाथ मंदिराबाहेर फुले विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, त्याच गल्लीत राहणाऱ्या प्रशांत बारसकर याच्या सोबत राजनाळे कुटुंबाचे जुने वैर आहे. तीन वर्षांपूर्वी राजनाळे आणि बारसकर कुटुंबात झालेल्या वादात प्रशांतने शैलेशच्या आईवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे 2 वा. प्रशांतने शैलेशचा भाऊ योगेशला 'तुझ्या भावाने माझ्यासोबत भांडण केले आहे, त्याला बाहेर पाठवून दे' असा दम दिला होता. याबाबत योगेशने सकाळी शैलेशला सावध देखील केले होते. त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास प्रशांतने शैलेशला गल्लीतील पुलाजवळ गाठले. तिथे जुन्या वादाची कुरापत काढत याने धारदार शस्त्राने शरीरावर अनेक ठिकाणी भोसकून शैलेशचा खून केला असे योगेशने दिलेल्या फिर्यादीत नमुद आहे. सदर फिर्यादीवरून प्रशांत बारसकर याच्यावर परळी शहर ठाण्यात कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा