Subscribe Us

header ads

पोलीस डिपारमेंट आणि पत्रकार यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन,

बीड स्पीड न्यूज 


सुपे प्रतिनिधी फिरोज मोगल,


पोलीस डिपारमेंट आणि पत्रकार यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन,


बारामती-:वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि सूपा येथील पत्रकार च्या वतीने सुपा ख्वाजा शहा मन्सूर दर्गाह येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी वडगाव निंबाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,साहेब, पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,रमजान महिन्याला मुस्लीम धर्मात विशेष महत्त्व असून या 

महिन्याला पाक महीना देखील म्हटले जाते संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लिम धर्मातील लोक अल्लाहची इबादत करतात आणि महिनाभर रोजा ठेवतात मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर पोलीस आणि सुपा पत्रकार यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, समाजात सलोखा राहावा हिंदू मुस्लीम ऐक्य राहावे यासाठी अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळाले यावेळी 

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन  सोमनाथ लांडे(,API) यांचा सत्कार मन्सूर युथ क्लब दर्गा कमिटीतर्फे करण्यात आला, यावेळी, सुपा ग्रामपंचायत सदस्य, मुनीर डफेदार, दर्गा कमिटीचे कार्यकर्ते, गालिब अली हसन शेख, आयुब युनूस शेख, अतुल खैरे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सर्व पोलिस कर्मचारी व सुपा येथील पत्रकार बांधव, जयराम सुपेकर, सुदामराव नेवसे, दीपक जाधव, सचिन पवार,  फिरोज मोगल व मुस्लीम बांधव, उपस्थित होते, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेबांनी, सर्वांना ईदसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती, शहा मन्सूर दर्गा कमिटीचे मुख्य विश्वस्त, इनुस कोतवाल, यांनी माहिती दिली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा