Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


वाकनाथपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


वाकनाथपुर प्रतिनिधी-:कोरोना महामारी मुळे  गेले दोन वर्ष कोणतेही उत्सव साजरे करण्यात आले नव्हते दोन वर्ष विश्वरत्न. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरामध्ये साजरी करण्यात आली होती आता या वर्षी विश्वरत्न .भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खेड्या पाड्यात ही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिनांक ३० एप्रिल वार शनिवार रोजी वाकनाथपुर येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली या वेळी जिल्ह्यातुन मोठ मोठे 

विचावंतांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी प्रथम सर्व महामानवांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले. तसे सर्व मान्यवरांचे कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या जयंतीचे औचित्य साधून प्रियदर्शी वाचनालय चे संचालक प्रा.अशोक गायकवाड. सौ. रानीताई अशोक गायकवाड (जाधव) तर्फे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. तसेच आर पी आय युवा तालुका अध्यक्ष सुभाष तांगडे यांच्या सह सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आणि केवळ ८ वर्षाची कुमारी  दिक्षा विशाल गव्हाणे. हिचे डॉ. 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अनमोल असे व्याख्यान झाले कमी वयात दिक्षा हिने अनमोल असे व्याख्यान करून सर्वांचे माने जिंकली. सर्व गावकऱ्यांनी दिक्षा हिला बक्षिसे दिली तसेच दिक्षा हीचा छोटा भाऊ श्रेयस विशाल गव्हाणे ६ वर्ष याने ही थोडक्यात व्याख्यान केले. प्रा. अंकुश कोरडे यांनी ही थोडक्यात विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाला आर पी आय युवा तालुका अध्यक्ष सुभाष तांगडे. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष किरण वाघमारे. प्रा.डॉ.राणीताई गायकवाड (जाधव) प्रा.अशोक गायकवाड. प्रा.अंकुश कोरडे. पशु वैद्यकीय डॉ. सिद्धार्थ निसर्गंध. विशाल गव्हाणे.यांची प्रमुख उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा