Subscribe Us

header ads

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

बीड स्पीड न्यूज 


राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

बीड प्रतिनिधी-:महाराष्ट्र दिन सोहळ्यानिमित्त बीड येथे राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे 

यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन संपन्न याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. समारंभास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य 

कार्यकारी अधिकारी अजित पवार, अपर जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीक 

यांची भेट घेऊन राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी सदिच्छा दिल्या त्यांच्या हस्ते पोलिस सन्मान प्रप्त झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी, तसेच महावितरण व  महसूलचे अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान  करण्यात आला. राज्यमंत्री श्री. बनसेाडे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, कोरोना संसर्ग 
जगातून पूर्णपणे गेलेला नाही, विविध देशात आजही लॉकडाऊन सुरु आहेत. आपल्या देशाला देखील भविष्यात चौथ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत आहे. जनतेला कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात आणि बीड जिल्ह्यात मोफत कोरोना लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा