Subscribe Us

header ads

लोकन्यायालयातील तडजोडीमुळे पुन्हा जुळला दुभंगलेला संसार

बीड स्पीड न्यूज 


लोकन्यायालयातील तडजोडीमुळे पुन्हा जुळला दुभंगलेला संसार

       

बीड, दि. 7 (जि. मा. का.) : बीड तालुक्यातील विवाहीत पती पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार होता. परंतू आपसातील गैरसमज विकोपास जावून ते गेले चार वर्ष एकमेकांपासून  विभक्त राहत होते वाढते मतभेद व दुराव्यामुळे ते घटस्पोट घेण्याच्या निर्णयापर्यंत 

पोहचले होते. कौटुंबीक न्यायालय बीड येथे घटास्पोटाचा दावा दाखल करण्यात आला.सदरचा वाद कौटुंबीक असल्याकारणाने तो दि. 07.05.2022 रोजीच्या राष्ट्रीय लोकन्यालयासमोर ठेवण्यात आला.  जिल्हा न्यायाधीश आर.एस.पाटील, न्यायाधीश कौटुंबीक न्यायालय 

सानिका जोशी यांनी उभय पती पत्नी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला दोघांना समुपदेशन केले उभय पती पत्नीचे अपसातील मतभेद दुर केले. दोघांचे मानोमिलन घडवून आणले. भविष्याचा व मुलाचा विचार करुन घटस्पोट न घेता उपयतांनी एकत्र संसार करण्याचा निर्णय 

घेतला. अशा प्रकारे तडजोडीमुळे दुभंगलेला संसार पुन्हा जुळला.या प्रसंगी प्रमुख जिल्हा सत्र व न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हेमंत श. महाजन यांच्या हस्ते पती पत्नी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा न्यायाधीश एस.टी. डोके, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिध्दार्थ ना.गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा