Subscribe Us

header ads

लोकन्यायालत वयोवृध्द महिलेला मिळाला तात्काळ न्याय

बीड स्पीड न्यूज 


लोकन्यायालत वयोवृध्द महिलेला मिळाला तात्काळ न्याय

 

बीड, दि. 7 (जि. मा. का.) :  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बीड येथे वयोवृध्द महिला छबुबाई लहानु वडमारे यांनी ऋणको चंपावती अर्बन को. ऑ. बँक बीड यांच्या विरुध्द वसूली दावा दाखल केला होता.सदरचा दावा दि.07.05.2022 रोजीच्या राष्ट्रीय लोकन्यायालयासमोर ठेवण्यात आला. जिल्हा न्यायाधीश आर.एस.पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचे अध्यक्ष एस.के. कुलकर्णी  बीड यांनी उभयपक्षाचे समुपदेशन  केले व त्यांनी आपसात समेट घडवून आणला या प्रसंगी वयोवृध्द महिला श्रीमती छबुबाई लहाणू वडमारे यांना तडजोडीतील रक्कम 30 हजार रुपयांचा दुसऱ्या 

प्रकरणातील श्री. रमेश पंडीतराव इंगळे यांना तडजोडीतील रक्कम 30 हजार रुपयांचा धनादेश प्रमुख जिल्हा सत्र व न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हेमंत श. महाजन बीड यांच्या हस्ते अदा करण्यात आला. लोकन्यायालयात आपसात तडजोड घडवून आणल्यामुळे मिळालेल्या तत्काळ न्यायाचे पक्षकाराने समाधान व्यक्त केले.या प्रसंगी न्यायाधीश कौटुंबीक न्यायालय सानिका जोशी जिल्हा न्यायाधीश एस. टी. डोके, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिध्दार्थ ना.गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा