Subscribe Us

header ads

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ स्मृतिदिन : बार्टी केंद्रात मान्यवरांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ स्मृतिदिन : बार्टी केंद्रात मान्यवरांचे प्रतिपादन


बीड / प्रतिनिधी-: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविले. म्हणून राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले. बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार (ता.६) रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात मान्यवर बोलत होते.उपस्थितांना संबोधित करताना मान्यवर म्हणाले की, आज राजर्षी शाहू महाराज यांचा शंभरावा स्मृतिदिन आहे. २ एप्रिल १८९૪ रोजी जनतेचे कल्याण करण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादिवर विराजमान झाले. पुढील २८ वर्षाच्या राज्य कारभारात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला.मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. शाहू महाराजांइतके योगदान आपल्याला देता येणार नाही पण मनामनात रुजलेल्या या जातीच्या भिंती पाडून शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण आपल्याला नक्की करता येईल.असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान शंभर सेकंद स्थब्ध राहून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  केंद्र प्रमुख यशवंत वावळकर,  ग्रंथपाल सचिन काकडे, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा.भरत खेत्रे, प्रा.दीपक सोनवणे, विनोद जोगदंड, राहुल शिंदे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा