Subscribe Us

header ads

अच्छे दिन / घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ

बीड स्पीड न्यूज 


अच्छे दिन / घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ


मुंबई-: सर्वसामान्य जनतेला शनिवारची म्हणजे आजची सकाळ एक झटका देणारी ठरली आहे. कारण घरगुती सिलेंडरच्या (LPG) किंमतींमध्ये ५० रूपयांची मोठी वाढ झाली आहे. घरगुती एलपीजीच्या वाढलेल्या किमती आजपासून देशभरात लागू झाल्या आहेत. LPG.भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर ९९९.५० रुपये असेल. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

याआधी २२ मार्च रोजी घरगुती घरगुती सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ९४९.५० रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे. किंमत वाढल्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक