Subscribe Us

header ads

आमदार प्रकाश सोळंके चे बेजबाबदार वक्तव्य -- राहुल चिरके

बीड स्पीड न्यूज 


आमदार प्रकाश सोळंके चे बेजबाबदार वक्तव्य -- राहुल चिरके 

माजलगाव| प्रतिनिधी-:नगर परिषदेच्या जेसीबी मशीनने पाडलेल्या संरक्षक भिंतीखाली दबून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. 28) माजलगाव मधील इदगाह मैदानावर घडली होती. शहर पोलिसात इदगाह मोहल्ला येथील समाज बांधव ऑपरेटर व मुख्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा यासाठी प्रेत घेऊन सात-आठ तास थांबले होते व त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.याप्रकरणी माजलगाव न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले, स्वच्छता विभाग प्रमुख जगदीश जाधवर, स्वच्छता कंत्राटदार, जेसीबीचा चालक आणि मालक अशा पाच जणांवर हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याने 279,304, अ 34,134, प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके नाराज असल्याचे आज रोजी पाहण्यास मिळाले व बेताल- बेजबाबदार वक्तव्य त्या निष्पाप मुलीच्या विरोधात आमदार महोदयांनी बोलले व आमदार प्रकाश सोळंके तुम्ही मुलीचे सांत्वन करण्याऐवजी गुन्हा खोटा दाखल केला असे तुम्ही कसे काय म्हणालात मुख्याधिकारी कडून तुम्हाला त्या स्वच्छता टेंडरमध्ये टक्केवारी मिळते का ? टक्केवारी मिळत असेल तर हे पार फेडावे लागेल आज दिनांक ६ मे २०२२ रोजी कै. सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव येथील आयोजित पत्रकार परिषद मध्ये खुलेआम मनाला की झुंडशाही जमा करून मुख्य अधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असे बोलून मोकळे झालात पण याची जाणीव आहे का आपण आमदार लोक प्रतिनिधी आहेत. तुम्ही त्या चिमुकलीच्या घरी जाऊन सांत्वन केलेच नाही शासकीय आर्थिक मदत ही केलीच नाही परंतु आपण जातीवादी आहात हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिले येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हालाही अल्पसंख्याक वर्ग जशास तसे उत्तर देईल अशी शहरांमध्ये चर्चेला उधान आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा