Subscribe Us

header ads

महेबुबनगर मधील पाण्यासाठी जीवन प्राधिकरणने घेतली दखल.;तीन महिण्यात पाईप लाईन.

बीड स्पीड न्यूज 


महेबुबनगर मधील पाण्यासाठी जीवन प्राधिकरणने घेतली दखल.;तीन महिण्यात पाईप लाईन.


माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव शहरातील महेबुबनगर भागातील नागरिकांची गेल्या दोन वर्षां पासुन पिण्याच्या पाण्यावाचून ससेहोलपट होत होती.या जीवनावश्यक समस्येची सोडवणुक करण्यात यावी यासाठी ‌प्रहार जनशक्ति पक्षाचे माजलगाव शहराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांनी भागातील नागरिकां सह वेगवेगळया प्रकारची आंदोलने करुन तहसिलदार ते विभागीय आयुक्तांना निवेदने देण्यात आली होती. पण ९नोव्हेंबर -२०२१ला जवळपास एका वर्षा करीता नगराध्यक्ष पदी विराजमान झालेले नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी हा भाग मुस्लिम बहुल वस्ती असतानाहि त्यांच्या समस्याचे खिल्ली उडवली होती आणि देखेंगे, अगले महिनेमें नई पाईप लाईन डालेंगे,हालाकी यह भाग न.प.के कार्यक्षेत्र में आता नही.अश्या चर्चा आंदोलन कर्त्यां सोबत केल्या होत्या त्यामुळे मुख्याधिकरी विशाल भोसले यांनी हि हाच धागा पकडून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या आलेला पत्रांना उत्तरे देतांना सांगितले होते की, न.प.सभागृहाने ठराव पारीत केला आणि त्यावर निधी खर्च करावा अशी तरतूद केल्यास पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पण मंजुर यांचा कार्यकाळ चार महिण्यां पुर्वी संपला तर मुख्याधिकारी विशाल भोसले शहरातील ईदगा मैदानातील स्वछता गरज नसतांनाही स्वच्छता निविदा धारकाशी संगनमत करून त्यांच्या भावाच्या जेसीबी ला आर्थिक फायदा झाला पाहिजे म्हणुन २८एप्रिल गुरुवार रोजी त्या भागातील एका ९वर्षीय मुलीचा अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाला होता.यावर जेसीबी चालकासह मालक,मुख्याधिकारी व इतर दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  भोसलेंचा न.प.शी सबंध राहिला नाही.याचा उहापोह करण्याचा उद्देश म्हणजे नागरिकांच्या स्मरणशक्तिला उजाळा देण्यासाठी. असो पण मुश्ताक कुरेशी या युवकाच्या चिकाटीने व विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कर्तव्य दक्षतेन २६मे गुरुवार रोजी जीवन प्राधिकरण केंद्र,मुंबई यांच्या अभियंत्यान सदर भागातील नागरिकांची समस्या जाणुन घेतली आहे आणि स्थळाची पाहणी करून लागणाऱ्या आवश्यक पाईप लाईन चा प्रस्ताव वरिष्ठां कडे सादर करण्याचे आश्वासन दिले आणि मंजुरी मिळाली तर दोन-तीन महिण्यात पाईप लाईन कार्यान्वीत होणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मुश्ताक कुरेशी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा