Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांचे पालकमंत्र्यांना निवेदन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण व अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याच्या कामास गती देण्याची मागणी

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांचे पालकमंत्र्यांना निवेदन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण व अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याच्या कामास गती देण्याची मागणी


बीड दि.२६ (प्रतिनिधी):- शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुळ्याची उंची वाढवणे व येथील ‌परिसर सुशोभित करणे यासोबतच बीड पंचायत समिती आवारात  कै.अण्णासाहेब‌ पाटील यांचा पुतळा उभा करण्याचा कामासंदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी गुरुवार (दि.२६) रोजी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व येथील ‌परिसर सुशोभित करणे,तसेच बीड पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये कै.अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा उभा करणे या कामांसाठी आ.संंदीप क्षीरसागर यांनी पाठपुरावा केलेला आहे.सदरील कामांना गती मिळावी याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले.यावर धनंजय मुंडे यांनी सदरील प्रस्तावित कामांवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले.हे निवेदन देताना आ.संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आ.संजय दौंड यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक