Subscribe Us

header ads

गेवराई तालुक्यातील अवैध वाळू प्रश्नावर उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 बीड स्पीड न्यूज 



गेवराई तालुक्यातील अवैध वाळू प्रश्नावर उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

आमदार लक्ष्मण पवार यांनी उपोषण मागे घेतले

सर्व लिलावधारक ता. गेवराई यांची वाळू दर कमी करण्यास सहमती

 

बीड प्रतिनिधी दि. 25 -: आमदार श्री लक्ष्मण पवार गेवराई मतदार संघ यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघात सुरु केलेल्या वाळू घाटावर प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन होत असलेबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी बीड यांचे अध्यक्षतेखाली गौण खनिज विषयक होणाऱ्या उत्खननाबाबत दिनांक 24 मे 2022 रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक बीड,सहायक पोलिस अधीक्षक उपविभाग केज, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार गेवराई, तहसीलदार बीड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड, उपविभागीय पोलिस अधिकारी बीड,गेवराई, पोलीस निरीक्षक गेवराई,चकलांबा इ. अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.महसूल व पोलिस अधिकारी यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत.वाळू वाहतूक करताना ज्या हायवा किंवा वाळू वाहतुकीची मोठी वाहने वाळू वाहतूक करत आहेत, त्या गाडींचे क्रमांक स्पष्ट दिसून येत नाहीत त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ज्या गाड्यावर क्रमांक नाहीत अशा गाड्यावर कार्यवाही करावी. विना नंबर हायवा दिसुन आल्यास त्यांना मागील व पुढील दर्शनी भागांमध्ये नंबर लावण्यात यावे. अवैध वाळु वाहतूक रोखण्याकरिता पोलीस विभाग तसेच महसूल विभाग यांचे संयुक्त पथक राक्षस भवन,माधळमोही रोड,गुंतेगाव फाटा, महाटाकळी फाटा, जातेगाव फाटा शिवाजी चौक तलवाडा व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 पाडळसिंगी टोलनाका या ठिकाणी चेकनाक्यांवर कार्यान्वित करण्यात येत आहे.गेवराई तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीबाबत संयुक्त पत्रकार सोबतच फ्लाईंग स्क्वाड (तहसीलदार व पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी) देखील नियुक्त करण्यात येत आहेत. पंकज कुमावत सहायक पोलिस अधिक्षक उपविभाग केज हे पोलिस कर्मचारी साठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच महसूल कर्मचारी पथकसाठी तुषार ठोंबरे अपर जिल्हाधिकारी, बीड हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.सर्व तहसीलदार जिल्हा बीड यांना दि. 20 मे 2022 रोजी शासन पत्रान्वयेव कळविण्यात आल्यानुसार गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना माहे 31 मे 2022 पर्यंत जीपीएस बसविण्याची कार्यवाही संबंधित वाहन धारकांना,लिलावधारकांना करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच दि. 01 जुन 2022 नंतर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर जीपीएस डिव्हाईस नसलेले निदर्शनास आल्यास महाखनिज प्रणालीद्वारे वाहतुक करणाऱ्या वाहनांना ईटीपी इश्यू करण्यात येणार नाही तसेच ईटीपी क्रमांकाशिवाय करण्यात येणारी वाहतुक व त्याद्वारे केलेली वाहतूक अवैध समजण्यात येईल.जिल्हाधिकारी बीड, यांनी नियुक्त केलेल्या पथकाद्वारे तत्काळ कार्यवाही करून अवैध वाळु वाहतुकीवर आळा घालण्यात येईल तसेच सदर वाळु वाहतुकीचे दर कमी करण्याच्या अनुषंगाने संबंधित लिलावधारक यांची दि. 24 मे 2022 रोजी 6:00 वाजता यांच्या सोबत बैठक घेऊन वाळु दर प्रती ब्रास कमी करण्याबाबत आवाहन केले असता सर्व लिलावधारक तालुका गेवराई यांनी वाळु दर कमी करणेबाबत सहमती दर्शविली आहे तसेच दि. 31 मे 2022 पर्यंत सर्व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणली बसवूनच गौण खनिज वाहतूक करणे बाबत सर्व लिलाव धारक यांना सूचित केले आहे. अन्यथा दिनांक 01 जुन 2022 नंतर विना जीपीएस केलेली वाहतूक ही अवैध समजुन दंडात्मक स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल याबाबत सूचित केलेले आहे.या प्रमाणे केलेल्या व करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत आमदार लक्ष्मण पवार, गेवराई मतदार संघ यांना अवगत करून उपोषणापासून परावृत्त होण्यास विनंती केली त्या अनुषंगाने आमदार लक्ष्मण पवार, गेवराई मतदार संघ यांनी  दि. 24 मे 2022 रोजी सायंकाळी 8:15 वाजता उपोषण मागे घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा