Subscribe Us

header ads

शासन-प्रशासन अल्पसंख्याक समाजाला दुय्यम वागणुक देत आहे लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 

शासन-प्रशासन अल्पसंख्याक समाजाला दुय्यम वागणुक देत आहे लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार


बीड प्रतिनिधि: देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत देशातील अल्पसंख्याक समाजाकडे शासनाने व प्रशासनाने जानून बुजुन दुर्लक्ष केलेले आहे दुय्यम वागणुक देवून उदासीन धोरण अल्पसंख्याक समाजाप्रती स्वीकारलेले आहे. याला समाजातील अनेक बुजगावणे नेतेमंडळी जबाबदार आहे. राम रहीम जपना पराया माल अपना म्हणत काही मुस्लिम नेतेमंडळी समाजातील युवाकांना देशाच्या राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात पुढे येवू देत नसल्याने व समाजातील सुशिक्षित नेते व युवा पीढ़ीचा सत्तेत सहभाग असल्याशिवाय समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विकास होणे अशक्य आहे अशी प्रतिक्रिया लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी संघटनेने पुकारलेल्या धरणे आंदोलनातील भाषणाद्वारे केली आहे.लोकसेना संघटना बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हक़्क़ासाठी विविध मागण्या सम्बन्धी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते.खालील मागण्यासाठी आंदोलन झाले आहे,
1) लवकरात लवकर बीड जिल्हा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करा अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करताना अशासकीय सदस्य म्हणून ज्या व्यक्तींना अल्पसंख्याक समाज संबंधित योजनांची कार्यपद्धती, पुर्ण माहिती असेल त्यांचीच नियुक्ती करण्यात यावी.
2) अल्पसंख्याक समाजाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच जनजागृती करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सोबत अल्पसंख्याक समाजातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांची मासिक बैठकीचे आयोजन करण्यात यावे.
3) जिल्ह्यासह राज्यातील उर्दू बालवाडयांना अंगणवाडीत रूपांतर करा.
4) अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवा 
5) परळी वैजनाथ येथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह (Girls & Boys Hostel) मंजूर होऊन ७ वर्ष होत आलेले आहे परंतु अजून वस्तीगृहांचे काम पूर्ण झालेले नाहीत. लवकरात लवकर सदरील वस्तीगृहांचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात यावे.
७) मुस्लिम मागासवर्गीय समाजाच्या लोकांना जाचक अटी न लावता जातीचे प्रमाणपत्र तात्काळ वितरित करा 
८) बीड शहरात लवकरात लवकर अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींसाठी मंजूर झालेले वसतिगृह बांधण्यात यावे.
९) जिल्ह्यासह राज्यात मुस्लिम समाजाच्या सामाजिक,आर्थिक ,शैक्षणिक प्रगती व शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन संस्थेची निर्मिती करण्यात यावी.
१०) मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुदत कर्ज, थेट कर्ज, व्यावसायिक कर्ज योजना सुरु करा.
 वरील मागण्यांसंबधी वारंवार निवेदन देऊन व अल्पसंख्याक हक्क दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सदरील प्रश्न मांडून ही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या विरुध्द आज. दि 26 मे 2022  जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा नसता पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांच्या सह जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, उर्दू एक्शन कमिटीचे निसार खतिब, खैसर बेग, संजय खांडेकर, अतीख अहमद खान, शेख अयाज़, शेख समीर, सालेम भैय्या, नगरसेवक शेख अमर, खुदाई खिदमतगार पठान संघटनेचे अध्यक्ष अय्यूब पठान, ओबीसी मुस्लिम संघटनेचे प्रा. रफ़ीक़ बागवान, शाह छप्परबंदचे शेख जाकेर, एमआय एम कर्मचारी संघचे सय्यद वज़ीर, बाबा मेंबर, सादेख़ मेंबर, हाफ़िज़ अशफाक मेंबर, हयात ग्रुपचे मुफ़्ती अशरफी, नविद इनामदार, शिक्षक भारतीचे अयाज़ कागज़ी, शिवसेनेचे जुबेर खान, खय्यूम इनामदार, अनवर मसरूर, शिवसंग्रामचे शेख अखिल, शेख अय्यूब, पॉपुलरचे सोहेल भाई, आबेद खान, शिवराज्य मुस्लिम फ्रंटचे शेख नविद, जुबेर काज़ी, साबेर शेख, शेख रज़ी, अदनान, जीशान, कामरान, वसीमताम्बोली,  तालेब भैय्या व बहुसंख्येने लोक उपस्थित होते.
                                 
                        
             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा