Subscribe Us

header ads

महेदवीया दायरा कब्रस्तानच्या जमीनदोस्त झालेल्या भिंती बांधण्यासाठी;दफनविधीसाठी पाण्याची सोय नाही !

बीड स्पीड न्यूज 

महेदवीया दायरा कब्रस्तानच्या जमीनदोस्त झालेल्या भिंती बांधण्यासाठी;दफनविधीसाठी पाण्याची सोय नाही !
बीड नगर परिषद ने बुजवलेली विहीर पुनरूज्जीवीत करून देण्याची मागणी !


बीड (प्रतिनिधी) - शहरातील मोमीनपुरा स्थित महेदवीया दायरा कब्रस्तानच्या जमीनदोस्त झालेल्या भिंती बांधण्यासाठी व मयत दफनविधीसाठी कब्रस्तानात पाण्याची सोय नसल्याने बीड नगर परिषदेने बुजवलेली कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करून द्यावी. अशी मागणी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड ने जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा वक़्फ़ अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील मोमीनपुरा स्थित महेदवीया दायरा कब्रस्तान ची विहीर बीड नगरपरिषदेने मोमीनपुरा बायपास रस्ता बनविताना बुजवून टाकली आहे. महेदवीया दायरा कब्रस्तान येथे हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम बनी इस्राईल फ़ानी फ़िल्लाह बाक़ी बिल्ला रहेमतुल्ला अलैह यांची दर्गा आहे. याकरिता ज़ियारत साठी संपूर्ण भारत देशातून वेगवेगळ्या राज्यातील भाविक ज़ायरीन येथे येतात. मात्र येथे येणाऱ्यांसाठी कब्रस्तान मध्ये वजू करण्याकरिता पाणी उपलब्ध नाही. महेदवीया जमाअ्त मध्ये कोणाचे निधन झाल्यास कब्रस्तान मध्ये दफ़न करण्यासाठीसुद्धा पाण्याची सोय नाही. तसेच महेदवीया दायरा कब्रस्तान च्या पश्चिम व उत्तर बाजू च्या दोन्ही भिंती जवळपास जमीनदोस्त झाल्याने त्याच्या बांधकामास सुरुवात करायची आहे. शिवाय कब्रस्तान मध्ये वेगवेगळ्या प्रकारची मज़बूत देशी झाडे तसेच शोभिवंत आणि फुलांची रोपे लावून कब्रस्तान सुशोभित करायचे आहे. या सर्व बाबी करिता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु बीड नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी मोमीनपुरा बायपास हा रस्ता निर्माण करताना कब्रस्तान ची विहीर बुजवून टाकल्याने महेदवीया दायरा कब्रस्तान आणि जमाअ्त ए महेदवीया सह देशभरातून येणाऱ्या ज़ायरीनचे सुद्धा पाण्याविना हाल होत आहेत. हे हाल थांबविण्याकरिता कब्रस्तान च्या विहिरीचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बीड नगरपरिषदेने बुजवलेली महेदवीया दायरा कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करून द्यावी. अशी मागणी  जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड चे अध्यक्ष परवेज मोहम्मद, सचिव मोहम्मद युसूफ, कोषाध्यक्ष मोहम्मद आरेफ, सदस्य शेख कदीर, शेख खालेद, जहीर हन्नूरे, शेख शाहेद यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि जिल्हा वक़्फ़ अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा