Subscribe Us

header ads

बेदम मारहाणमुळे तरुण रिक्षाचालकाचा मृत्यू!

बीड स्पीड न्यूज 


बेदम मारहाणमुळे तरुण रिक्षाचालकाचा मृत्यू!



अंबाजोगाई प्रतिनिधी-: येथील रायगड नगर भागात मंगळवारी (दि. २४) रात्री उशीरा २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. भांडणातून मारहाण झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.जावेद सिकंदर शेख (वय २४, रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार रिक्षाचालक असलेल्या जावेद मंगळवारी रात्री सात-आठच्या सुमारास रिक्षाभाडे घेऊन गांधीनगर भागात गेला होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बुलेट मोठारसायकलला रिक्षाचा धक्का लागला यामुळे मोटारसायकल मालक व पाच-सहा जनांनी मिळून जावेद यास बेदम मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर जावेद घरासमोर पोहचताच जमिनीवर कोसळला कुटुंबीयांनी त्यास स्वाराती येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असुन त्याचे शवविच्छेदन होवुन मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे.मृत्यूचे नेमके कारण काय हे अहवालानुसार कळेल. जावेदच्या वडिलांनी पोलीसांना जवाब दिला असुन लोकांशी वाद झाला होता. त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे जावेद बेशुद्ध पडला. त्यानंतर स्वाराती रुग्णालयात त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जावेदच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून त्याच्या अहवालानंतरच जावेदच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे. अद्याप याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. मयत जावेदच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि तीन अपत्ये असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा