Subscribe Us

header ads

अल्पसंख्याक कल्याण समिती सह विविध मागण्यांसाठी गुरुवारी लोकसेना संघटना तर्फे धरणे आंदोलनात मोठया संख्येने उपस्थित रहावे :- शेख अयास शेख समीर

बीड स्पीड न्यूज 


अल्पसंख्याक कल्याण समिती सह  विविध मागण्यांसाठी गुरुवारी लोकसेना संघटना तर्फे धरणे आंदोलनात मोठया संख्येने उपस्थित रहावे :- शेख अयास शेख समीर

प्रतिनिधी:- बीड जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समिती, ऊर्दू बालवाडी, वसतिगृह सह विविध मागण्यांसाठी गुरुवारी दिनांक 26 मे 2022 रोजी लोकसेना संघटने तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर अध्यक्ष शेख अयास शहर उपअध्यक्ष शेख समीर यांनी केले आहे.अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती व मा. पंतप्रधानाच्या 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी तसेच स्थानिक अल्पसंख्यांक समाजचे समस्या सोडवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती स्थापन केली जाते. पण दुर्दैवाने आजपर्यंत बीड जिल्ह्यात अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करण्यात आली नाही. अल्पसंख्याक समाज संबंधित योजनांबद्दल जिल्हा प्रशासन उदासीन आहे.तसेच सन २०१२- २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यम जिल्हापरिषद शाळा संग्लन १६० उर्दू बालवाड्या सुरु करण्यात आले होते. परंतु गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यातील अनेक उर्दू बालवाड्या गायब झाल्या आहेत. सुविधांनआभावी अनेक बालवाड्या बंद आहेत व अनेक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे उर्दू भाषिक लहान मुलांचे कधीही न भरणारे नुकसान होत आहे. ऊर्दू बालवाड्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, बीड व परळी येथील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे या सह अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्यासाठी गुरूवार दिनांक 26 मे 2022 रोजी लोकसेना संघटने चे प्रमूख प्रा. इलियास इनामदार सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकसेना संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सूफियान मनियार, अतिक अहमद, अयाज शेख, शेख इम्रान, अकबर अतार, सालेम भैय्या, शानु शेख  ,शेख समीर, व इतरांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा