Subscribe Us

header ads

दुर्दैवी घटना: विहिरीत पोहण्यास गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू;

बीड स्पीड न्यूज 


दुर्दैवी घटना: विहिरीत पोहण्यास गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू;



बीड प्रतिनिधी-:पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी एका मुलाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड शहरातील बार्शी नाका भागात मंगळवारी घडली. मुलाचा मृतदेह सायंकाळी विहिरीतून पाण्याबाहेर काढण्यात आला. भय्या मारुती शिंदे (१५) असे मृत मुलाचे नाव आहे. बीड शहरातील बार्शी नाका, वडार वस्ती भागातील भय्या मारुती शिंदे हा त्याच्या अन्य तीन मित्रांसह शहरातील प्रकाश आंबेडकरनगर परिसरातील विहिरीवर मंगळवारी पोहण्यासाठी गेला होता.विहिरीत उडी घेतल्यानंतर भय्या शिंदे वर आलाच नाही, तो पाण्यात बुडाला. त्याच्या अन्य मित्रांनी वस्तीवर जाऊन कुटुंबीयांना माहिती दिली. दरम्यान, नातेवाइकांसह अन्य नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली तेव्हा विहिरीच्या काठावर मुलाचे कपडे व चप्पल दिसून आली. अग्निशामक दलाच्या पथकाला परिश्रम घेऊन अखेर सायंकाळी मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा