Subscribe Us

header ads

बीडमध्ये 'संविधान' चित्रपटासाठी नि:शुल्क ऑडिशन दिग्दर्शक व्ही.सत्तू : नवोदित कलाकारांनी ऑडिशनसाठी उपस्थित रहावे




बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये 'संविधान' चित्रपटासाठी नि:शुल्क ऑडिशन

दिग्दर्शक व्ही.सत्तू :  नवोदित कलाकारांनी ऑडिशनसाठी उपस्थित रहावे


बीड / प्रतिनिधी-: क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंट निर्मित दंडम चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर बीडचे भूमिपुत्र व्ही. सत्तू आता बिग बजेट असलेला संविधान एक वरदान हा  हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपट घेऊन येणार आहेत. त्या अनुषंगाने नवोदित कलाकारांसाठी  नि:शुल्क ऑडिशन घेतले जाणार आहे. सदरील ऑडिशन बीड शहरातील दि वूमन वर्ल्ड, नगरनका येथे रविवार (ता.२९) रोजी घेतले जाणार आहे. तरी या नि:शुल्क ऑडिशनसाठी नवोदित कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटचे प्रमुख तथा चित्रपटाचे निर्माता व्ही.सत्तू यांनी केले आहे.करिअरच्या टप्प्यावर कोणतेही काम अथवा एखादी कलाकृती उभा करणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी अथक संघर्ष आणि कष्ट उपसावे लागतात. त्यानंतरच  त्या व्यक्तीला लौकिक व मान सन्मान मिळत राहतो. चित्रपट बनविण्याचे कोणतेही शिक्षण नसताना चित्रपट बनविणे व तो रिलीज करणे मोठे आव्हानात्मक काम आहे. मात्र असे असताना दंडम सारखा बिग बजेट ऍक्शन चित्रपट प्रदर्शित करून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणारे व्ही. सत्तू  आता अतिशय महत्वाचा विषय घेऊन संविधान एक वरदान नावाचा चित्रपट बनवीत आहेत. त्या चित्रपटाचे नाव आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतले मोठं-मोठे कलाकार घेऊन संविधान हा चित्रपट मेकिंग केला जाणार आहे. या चित्रपटासाठी ऑडिशन घेऊन नवोदित कलाकारांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे ऑडिशनसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटचे प्रमुख तथा चित्रपटाचे निर्माता व्ही.सत्तू यांनी केले आहे. काही अडचण असल्यास  व्हाट्सअप क्रमांक 9561368637 तर कॉलसाठी 9226481728, 9563307307 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा