Subscribe Us

header ads

बीड जिल्हा कोरोनामुक्त करणाऱ्या योद्धांचा सन्मान आनंदोत्सव : प्रत्येक संवर्गातील एका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात कौतूक

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा कोरोनामुक्त करणाऱ्या योद्धांचा सन्मान
आनंदोत्सव : प्रत्येक संवर्गातील एका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात कौतूक



बीड प्रतिनिधी-: कोरोना महामारीत स्वता:चा जीव धोक्यात घालून सामान्यांचा जीव वाचविण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कौतूक सोहळा सोमवारी थाटात पार पडला. शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याने कोरोनामुक्तीचा मोकळा श्वास घेतला. त्याबद्दल ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्यावतीने याचा छोटेखानी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आशाताई ते सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी या प्रत्येकाच्या संवर्गातील एकाचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांच्या संकल्पनेतून हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला.जिल्हा परिषद जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सोमवारी दुपारी ३ वाजता जिल्हा काेरोनामुक्ता झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षांत ग्राऊंड लेव्हलला काम करणाऱ्या आशाताई पासून ते जिल्हास्तरावरील प्रत्येक अधिकाऱ्याने जीव धोक्यात घालून काम केले. तसेच अनेकांनी स्वत:च्या कुटूंबापासून दुर राहून सामान्यांचे कुटूंब सुरक्षित ठेवले. या सर्वांचे परिश्रम आणि सामान्य नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन केल्याने २१ मे २०२२ रोजी जिल्हा कोरोनामुक्त झाला. या महामारीच्या काळात कर्तव् बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांच्या संकल्पनेतून कौतूक सोहळ्याचे आयोजन केले होते. यात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासून ते गाव पातळीवर काम करणाऱ्या आशाताई पर्यंतच्या सर्वच संवर्गाच्या लोकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही आपल्या कामाची दखल घेत कौतूक केल्याने समाधान व्यक्त केले.
---
यांचा झाला सन्मान

सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.झेड.सय्यद, आरोग्य सेवक मदतन सापते, परिचारीका पी.एस.डाके, तालुका नर्सिंग ऑफिसर, प्रतिभा कुर्लेकर, आशाताई उषा भागवत ढवळे, आकाश शहाणे, दीपक जायभाये, वैजिनाथ बरबडे, संदीपान मांडवे, दिनेश गाडे, सय्यद जाफर, शेख, अभय लोकरे या प्रत्येकाचा त्यांच्या संवर्गातील प्रतिनिधी म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष गुंजकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
---
हा सन्मान सर्वांचाच - डॉ.अमोल गित्ते

जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंदच आहे. परंतू भविष्यात असे संकट पुन्हा येऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. गाफील राहू नये. अन्यथा कोरोनामुक्तीचा आनंद अवघ्या काही दिवसांचा राहू शकतो, अशी भिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी व्यक्त केली. तसेच माझ्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळेच प्रत्येक संवर्गातील एकाला बोलावून प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केला. हा सन्मान त्यांचा एकट्याचा नसून सर्व संवर्गाचा आहे. प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधल लस घेऊन सुरक्षित रहावे, असे आवाहनही डॉ.गित्ते यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा