Subscribe Us

header ads

बहुजन नायक पुरस्कार सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान-मा. संदीप उपरे

बीड स्पीड न्यूज 


बहुजन नायक पुरस्कार सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान-मा. संदीप उपरे
बहुजन नायक पुरस्काराचे दिमाखदार सोहळ्यात वितरण



माजलगाव प्रतिनिधी-: तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन आज ग्रामीण भागात तळागाळात सर्वसामान्य कार्यकर्ते तन-मन-धनाने निस्वार्थी आणि स्वाभिमानाने कार्य करतात . अशा सामान्य कार्यकर्त्यांची दखल सामाजिक समता अभियान घेऊन बहुजन नायक पुरस्कार 2022 प्रदान केला हा पुरस्कार सामान्य कार्यकर्त्यांचा केलेला सन्मान आहे. असे प्रतिपादन सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य अध्यक्ष संदीप भैया उपरे यांनी केले.माजलगाव येथे सामाजिक समता अभियान च्या वतीने तथागत बुद्ध,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त *बहुजन नायक पुरस्कार 2022* व *युवक परिषदेचे* चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरस्काराचे वितरण सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप भैय्या उपरे, मार्गदर्शक सामाजिक समता अभियान चे अध्यक्ष प्रवीणकुमार डावरे , प्रा.डा. विठ्ठल जाधव , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जावळे, प्रा. ईश्वर डोंगरदिवे ,चरणदास ढोकणे,बीड जिल्हा अध्यक्ष प्रा. अमोल वाघमारे, स्वागताध्यक्ष विजय राऊत, मुख्य संयोजक पंकज साळवे, तालुकाध्यक्ष अरविंद लोंढे यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.
बहुजन नायक पुरस्कार व युवक परिषदेच्या अनुषंगाने सामाजिक समता अभियान चे अध्यक्ष प्रवीणकुमार डावरे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना युवक ही चळवळीची ताकद असते म्हणून युवकांनी आंबेडकर चळवळ गतीमान करण्यासाठी आंबेडकरी चळवळीत सहभागी व्हावे . असे प्रतिपादन केले तर सामाजिक समता अभियानाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विठ्ठल जाधव यांनी 

संविधान सभ्यताआज समाजात आणि देशात रुजविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जावळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सामाजिक समता अभियान ची भूमिका व सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक समता अभियान ही तरुणांचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी तरुणांना बळ देण्यासाठी कार्य करणारी संघटना आहे. अनेक  उदाहरण देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चरणराज ढोकणे यांनी सुद्धा आपले मत मांडले.यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून प्रभाकर साळवे प्रा. धम्मानंद बोराडे, प्रमोद साळवे ,  अमित वाघमारे ,अशोक मगर, पांडुरंग जाधव, बाबा जाधव, प्रशांत बोराडे, लक्ष्‍मण वाघमारे ,रोहन किर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल ससाने, राजकुमार मोरे, धुराजी कांबळे ,आनंद साळवे ,विजय डावरे ,राहुल वाघमारे, चेतन मोरे ,भगवान ससाने,यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक समता अभियान चे  मराठवाडा संघटक पंकजकुमार साळवे व प्रभाकर साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन धम्मानंद बोराडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा