Subscribe Us

header ads

टोकवाडीत बोगस कामे करणारांची चौकशी करावी; बीड जिल्हा परिषदे समोर वंचितचे उपोषण सुरू सभापतींच्या गावात अनागोंदी कारभार

बीड स्पीड न्यूज 


टोकवाडीत बोगस कामे करणारांची चौकशी करावी; बीड जिल्हा परिषदे समोर वंचितचे उपोषण सुरू सभापतींच्या गावात अनागोंदी कारभार 

बीड  ( प्रतिनिधी  ) दि.23 तालुक्यातील माजी पंचायत समितीचे सभापती पिंटू मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस कामे करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्त्तेदार आणि एजन्सी यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व गौतम आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे वतीने बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला सुरवात झाली आहे.याबाबत वंचित बहुजन आघाडीने मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मातंग वस्तीतील मंजूर कामे परवानगी नसताना इतरञ निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. टोकवाडीत बुध्द विहाराच्या बाजूला सरफेस असताना तसेच रस्ता, नाल्या चांगल्या असतांनाही त्याच ठिकाणी कामे करून लाखोंचा भ्रष्टाचार केला.  25/15 अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी याबरोबरच एकाच ठिकाणी दोन दोन योजनेतील कामे करून बोगस बीले उचलण्यात आली याची चौकशी करावी.सदर मागण्यांसाठी आज दि. 23 मे पासून वंचित बहुजन आघाडीचे परळी महासचिव विष्णू मुंडे, गौतम आगळे, राजू जोगदंड, साहेबराव रोडे ,कपील राठोड ,यशोदा राठोड ,कविता राठोड यांच्यासह महिलांनी उपोषण सुरू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा