Subscribe Us

header ads

केज शहरात विनापरवाना स्फोटक पदार्थ (फटाके) विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांची धाड; सुमारे १,७६ooo हजार रुपयांचा माल जप्त एकावर गुन्हा दाखल...

बीड स्पीड न्यूज 


केज शहरात विनापरवाना स्फोटक पदार्थ (फटाके) विक्री  करणाऱ्या दुकानावर पोलिसांची धाड; सुमारे १,७६ooo    हजार रुपयांचा माल जप्त एकावर गुन्हा दाखल...


केज प्रतिनिधी-: याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२५-५-२०२२ रोजी ३-३५ वाजता केज येथील बेकायदेशीर न्यु फेमस फायर वर्क्स नावाने आयडिबीआय बँकेसमोर सुलेमान इस्माईल शेख रा. सावळेश्वर हा शेख इस्माईल बाबन यांच्या बेकायदेशीर परवान्याच्या आधारे स्फोटके विक्रीचे दुकान मागील तीन वर्षापासून चालवत होता. स्वतःच्या फायद्यासाठी स्फोटक पदार्थ बाळगून, ज्यामुळे मानवी जीवन धोक्यात येईल अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत आगर नुकसान होण्याचा संभव आहे इतक्या बेदरकारणाने सुरक्षेतेची कोणतीही काळजी न घेता हायगाईने स्फोटक पदार्थ, आवाजाचे फटाके, शोभेची दारु बाळगण्याचे निदर्शनास आल्याने सदर ठिकाणी छापा मारून १७६७४० रुपयाचे स्फोटके जप्त करून पोलीस नाईक. उमेश बाबुराव आघाव यांच्या फिर्यादीवरून ठाणे अंमलदार रूक्‍मीन पाचपिंडे गु.र.नं.१८७/२०२२ भा. द. यासह पदार्थ (द्रव्य) अधिनियम १८८४ चे कलम ९(ब)(१)(ब) सुलेमान इस्माईल शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला असून स.पो.नी. शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. भोले आधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे केज शहर व परिसरात अनेक ठिकाणी विनापरवाना फटाके विक्री करणार्याचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा