Subscribe Us

header ads

संजय जाधव यांना "सुवर्णतारा" पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

संजय जाधव यांना "सुवर्णतारा" पुरस्काराने सन्मानित


पुणेः येथील 'सुवर्णविचार मंच ' च्या वतीने कटिबंध चित्रपट निर्माता संजय जाधव यांना "सुवर्णतारा"पुरस्काराने आयोजित कार्यक्रमात सपत्नीक सन्मानित करण्यात आले.संत नरहरी महाराज यांच्या जीवनावर आधारीत "कटिबंध" या चित्रपटाची निर्मिती संजय जाधव यांनी करुन सुवर्णकार समाजात संताची ओळख करुन देण्याचे कार्य केले.  व आदी कार्य आढाव्यानुसार 'सुवर्ण विचार मंच 'ने महालक्ष्मी हाॕल,पुणे येथे दि.२५ मे २०२२ रोजी आयोजित केलेल्या वासंतिक स्नेह संमेलन मेळाव्यात चित्रपट निर्माता संजय जाधव व सौ.सुनिता जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र व "सुवर्णतारा" पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनराव खेडकर हे होते.प्रमुख अतिथी म्हणून नंदकुमार वडनेरे,कृष्णकुमार पिंपळगावकर,प्रमोद दुसाने,सुभाष दंडगव्हाळ,मिलिंद दुसाने,विजयराव काजळे,बापुसाहेब पिंगळेआदी मान्यवर उपस्थित होते.अहिर सुवर्णकार समाज ,पुणे च्या वतीने प्रथमच कटिबंध या चित्रपटास सन्मान मिळाला असल्याचे व्यक्त करण्यात येत आहे.या अगोदर चित्रपट निर्माता संजय जाधव यांना महाराष्ट्र रत्न (मुंबई ),गोदारत्न (नाशिक ),समाज रत्न (मुंबई ),जीवन गौरव (नाशिक ),शिखर सन्मान(नागपुर),सुवर्णगौरव (धुळे),पोलिस मित्र (मालेगाव),चित्रपट गौरव पुरस्कार  (नागपुर) आदी संस्था,संघटना यांनी कार्याच्या आढाव्यानुसार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नुकताच  "सुवर्णतारा"पुरस्कार मिळाला बद्दल त्यांचे सर्वशाखीय सुवर्णकार समाजातुन  अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा