Subscribe Us

header ads

स्त्री शक्ती फाउंडेशन च्या राज्यस्तरीय उन्हाळी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

बीड स्पीड न्यूज 


(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

स्त्री शक्ती फाउंडेशन च्या राज्यस्तरीय उन्हाळी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद



पुणेः येथील 'स्त्री शक्ती फाउंडेशन 'च्या वतीने आयोजित 'अध्यात्मिक गजानन ग्रुप' चा सहभाग व 'रुग्वेद न्युज चॕनेल,नागपुर च्या सौजन्याने  आॕनलाईन 'राज्यस्तरीय उन्हाळी शिबीराचे' आयोजन करण्यात आले होते.त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.पिंपरी चिंचवड भागातील नव्यानेच स्थापन झालेल्या  "स्त्री शक्ती फाउंडेशन " आयोजित  'राज्यस्तरीय उन्हाळी शिबीर' (समर व्हेकेशन )विनामुल्य दि.१५ते २२मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात प्रामुख्याने अध्यात्मिक गजानन ग्रुप चा सहभाग व रुग्वेद न्युज चॕनेल च्या सौजन्य होते.संयोजिका म्हणून स्त्री शक्ती फाउंडेशन च्या अध्यक्षा  सौ.अर्चना सोनार यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या काम पाहिले. वयोमर्यादा  सोळा वर्षाखालील सुमारे ३६३ मुला-मुलींनी भाग घेतला.तर शिबिरात मंडेला आर्ट, टाकावु वस्तुपासुन टिकाऊ वस्तु बनवणे,आर्टअँड क्राफ्ट,स्केचेस ड्राॕईंग,मेहंदी/अरेबिक मेहंदी,पाककला,सायन्स प्रोजेक्ट ,स्टोन आर्ट/रंगोली आर्ट ,मार्बल केक ,डिझाईन आर्ट  या विषयाचा समावेश होता.लहान मुलांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा. या शिबिराचा उद्देश होता. शेवटच्या दिवशी "सामान्य ज्ञान प्रश्नोत्तर "चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये १७८मुला/मुलींनी  भाग घेतला शिबिरात प्रशिक्षक(ट्रेनर)म्हणून  निलय जाधव ,जानवी जाधव,नारायणी विसपुते,दिव्या दुसाने, मयुरी जोशी, हिमाणी जोशी ,प्रीतीका मंडल,श्लोक बागुल,आर्या बागुल ,अभिनीत बोरसे,अभिषेक बोरसे,चिन्मय वाघ,समर्थ कर्णे, सार्थक कर्णे यांनी सहभाग घेतला होता.परीक्षक व अतिथी  म्हणून  सौ.वंदना गोकुलदास बागुल (औरंगाबाद ),सौ.कल्पना सोनार(बडोदा ),सौ.सुनिता सोनी (सुरत),सौ.वर्षा राठोड(मुंबई ), श्रीमती शशिकला सोनार(उल्हासनगर),डाॕ.दिपाली विसपुते(पनवेल),प्रीती नंदलाल मोरे(धुळे)ह्या होत्या.संपुर्ण महाराष्ट्र तसेच गुजरात येथुन प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष मान्यवरांनी या शिबीर आयोजनाचे कौतुक करुन  संयोजिका सौ.अर्चनाताई सोनार यांचे विशेष प्रतिक्रिया व्यक्त करुनअभिनंदन व कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा