Subscribe Us

header ads

परतुर येथे वैश्य सुवर्णकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 


(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे ,मुक्त पत्रकार ,पुणे)

परतुर येथे वैश्य सुवर्णकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न



पुणेः  सुवर्णकार समाजात एकमेकांशी सुसंवाद साधता यावा.तसेच समाजाची उन्नती व्हावी या उद्देशाने परतुर येथे वैश्य सुवर्णकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला.परतुर जि.जालना येथे वैश्य  सुवर्णकार समाजाच्या परतुर,वाटुर व मंठा येथील वैश्य सुवर्णकार समाजाच्या वतीने हा वधु-वर मेळावा दि.८मे रोजी आयोजित केला होता.या विभागातील या प्रथम सामाजिक उपक्रमात समाजातील विवाहोत्सुक वधु-वरांनी नोंदणी करुन परिचय दिला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंठा येथील ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्तेअच्युतराव सराफ हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून वैश्य सुवर्णकार समाजाचे सल्लागार अशोकराव वारेगावकर(औरंगाबाद ),वधु-वर सुचक मंडळाचे संयोजक अध्यक्ष मनोहरराव कपाळे,वैश्य सुवर्णकार संघटना परतुर,मंठा तालुका अध्यक्ष पद्माकर ओवळे,वैश्य सुवर्णकार युवक  मंडळ,औरंगाबाद चे सचिव वामनराव सराफ, वैश्य सुवर्णकार सामाजिक संघटना ,बीडचे अध्यक्ष अरुणराव करमाळकर,सामाजिक कार्यकर्ते रमेशअण्णा खराडकर,सेलु येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी गोविंदराव उत्तमराव सराफ,वैश्य सुवर्णकार मंडळाचे सल्लागार दिनकरराव देवगिरीकर,सामाजिक  कार्यकर्ते   ,बालासाहेब कपाळे,दत्ता नाल्टे (सेलु),समाजातील पत्रकार शंकरराव कपाळे (औरंगाबाद )आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

प्रारंभी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्तविकात डाॕ.श्रीधर भाग्यवान यांनी समाजातील लग्न न जुळण्याचे विविध बाबीनुसार कारणे विषद् करुन मुला -मुली मधील शिक्षणामधील तफावत,स्त्रीभ्रुण हत्याचा परिणाम व मुलींचा जन्मदर घटणे,तसेच सद्य परिस्थितीत लग्न करण्यासाठी मुला-मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आदी संबधीच्या बाबीचा उल्लेख करुन प्रथमच असा कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. आयोजकांनी मान्यवरांचे स्वागत केले.अनेकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात मुला-मुलींनी आपल्या माहितीची नोंदणी केली.वरदविनायक लाॕन येथे आयोजित केलेल्या या भव्य मेळाव्यास विविध ठिकाणाहुन समाजबांधव ,भगिणी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या परिचय मेळाव्याचे सुत्रसंचलन घनसांवगी येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा ढेकळे यांनी उत्कृष्टरित्या केले.आभारप्रदर्शन मंठा येथील नागेश सराफ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा