Subscribe Us

header ads

हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि उघड्यावर पडलेल्या "वंजारी समाजातील" सानप कुठुंबाचे पुनर्वसन होऊ पर्यंत त्यांच्या पाठीशी--- किशन तांगडे

बीड स्पीड न्यूज 


हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि उघड्यावर पडलेल्या "वंजारी समाजातील" सानप कुठुंबाचे पुनर्वसन होऊ पर्यंत त्यांच्या पाठीशी--- किशन तांगडे


बीड प्रतिनिधी-:सानप परिवाराची व्यथा ऐकून मन सुन्न झाले आणि अशी वेळ कोणावर ही येऊ नये असे मनस्वी वाटले तांदळवाडी(भिल्ल)येथील सौ.मंदा कचरू सानप यांची करुण कहानी काही वर्षा पूर्वी विवाहित मुलीचा घातपात झाला नवरा कचरू जिजाबा सानप हे भोळसर स्वभावाचे असून अक्षरक्ष:भिक्षा मागतात मुलगा सुदर्शन कचरू सानप हा अपंग असून स्वतः ला जमेल ते काम करतो राहायला घर देखील व्यवस्थित नाही एके दिवशी या मावशी ने बीड च्या न्यायालयात येऊन एका वकील बांधवास आपली करुण कहाणी सांगितली,त्या वकील बांधवानी त्या सानप मावशी ला असे सांगितले की,मावशी तुम्ही अजिबात इकडे तिकडे फिरू नका किशन तांगडे यांना भेटा,ते तुमच्या सर्व समस्या सोडवतील.असे सांगून माझा मो.नं.त्यांना दिल्या नंतर त्या सानप मावशी ने मला फोन करून तांगडे साहेब तुम्हाला भेटायचे आहे,असे म्हणाल्या नंतर मी योगायोगाने त्या वेळी भाजी मंडई परिसरात होतो.त्या तेथे आल्या आणि मला सर्व आप बिती हकीगत सविस्तर पणे सांगितल्या नंतर तांगडे भाऊ आम्ही सध्या आमचा कसा बसा गुजरान करू शकतोत,पण आम्हाला राहायला अजिबात घर नाही,आम्ही सध्या पडक्या घरात राहत आहोत.आम्हचे दारिद्र्य रेषेत नाव नाही,आम्हाला राशन कार्ड नाही.या सर्व बाबीचा विचार करून मी लागलीच बीड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब यांना आणि बिडिओ अनुरथ सानप साहेब यांना या विषयी सविस्तर पणे सांगून या मावशीला आपणास विशेष बाब म्हणून निवारा (घरकुल) द्यावेच लागेल असे सांगितले.त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन हा प्रश्न आपण लवकरात लवकर 100% मार्गी लावू असे सांगितले.
हे मी त्यांना सांगितल्या नंतर त्या मावशीच्या तोंडावर आनंद ओसंडून वाहत होता.तात्पर्य सर्वच जाती - धर्मात गरिबी आहे,आणि गरिबाला जाती - पाती चे देणे- घेणे नसते,त्यामुळे गरिबाला मदत करणे हे आपल्या सारख्यां सर्वाची नैतिक जिम्मेदारीच आहे,असे मी मानतो.
      
# आम्ही साथी सत्याचे.#
   *जय भिम* *जय शिवराय*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा