Subscribe Us

header ads

बेदम मारहाण करून विवाहितेचा खून; पतीसह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


बेदम मारहाण करून विवाहितेचा खून; पतीसह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल





आष्टी|प्रतिनिधी-: कोणालाही न सांगता विवाहिता घरातून निघून गेली होती. त्यामुळे संतापलेला पती, सासरा आणि दिराने ती घरी परत येताच तिला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पती, सासर आणि दिरावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
मनीषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले (वय २५, रा. शेरी बुद्रुक) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. तिची बहिण अश्विनी राळेभात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषाचे लग्न सात वर्षापूर्वी बाबासाहेब अशोक वाघुले याच्यासोबत झाले होते. शनिवारी (दि. ०७) दुपारी मनीषा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली असून ती तुमच्याकडे आली आहे का अशी चौकशी बाबासाहेबने अश्विनी यांच्याकडे केली होती. त्यानंतर बुधवारी (दि. ११) दुपारी एक वाजताच्या सुमारास बाबासाहेबने पुन्हा अश्विनीला फोन केला आणि मनीषा घरी आली असून मी तिला २-३ चापटा मारल्याचे सांगितले. यावेळी मनीषाने फोन हातात घेऊन या लोकांनी मला खूप मारले आहे, आता मारू नका असे त्यांना सांग म्हणाली. त्यामुळे अश्विनीने विनंती केल्यावर बाबासाहेबने मनीषाला आता मारहाण करणार नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर बाबासाहेब, त्याचे वडील अशोक नारायण वाघुले आणि भाऊ प्रकाश या तिघांनी मनीषाला कुठल्यातरी वस्तूने मारहाण करून तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.सदर फिर्यादीवरून बाबासाहेब, अशोक आणि प्रकाश वाघुले या तिघांवर आष्टी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक