Subscribe Us

header ads

अंबिका चौकातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूच्या टिप्परने दिली खांबयाला जोराची धडक; खांब व तारा तुटून पडले

बीड स्पीड न्यूज 


अंबिका चौकातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूच्या टिप्परने दिली खांबयाला जोराची धडक; खांब व तारा तुटून पडले 



बीड|प्रतिनिधी-: काल रात्री शाहुनगर भागातील अंबिका चौकात वाळुचा टिप्पर चोरट्या मार्गाने येत असताना या टिप्परने लाईटच्या खांबयाला जोराची धडक दिल्याने खांब व तारा तुटून पडले होते.यात कोणत्याही जिवीत हानी झाली नाही. परंतु हे वाळू माफिया बिनधास्तपणे विना रॉयल्टी पावतीचे अंबिका चौक, राजीव गांधी चौक, डीपी रोड, या चोरट्या मार्गाने आपले अवैध धंदे चालवीत आहे.हे टिप्पर काही राजकीय नेत्याची असल्याने प्रशासनाची यांच्यावर कारवाई करायला हिम्मत होत 

नाही. हे सर्व महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, आणि पोलीस प्रशासन, फक्त बघायची भूमिका घेत आहे. मग या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई कोण करणार आहे.?? मंडल अधिकारी. तहसीलदार महसूल विभाग. पोलीस प्रशासन हे वाळू माफियांचा पाठराखण करण्यासाठीं आहे का.? असे या भागातील लोक बोलून दाखवित आहे.या सर्व अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणाने वाळू माफिया विना रॉयल्टी पावतीची बिनधास्तपणे वाळू उपसा करीत 

आहे.जर अवैध धंद्यांना साथ दिली जात असेल तर कायदा सुव्यवस्थेला मुठ माती द्यायला वेळ लागणार नाही! या वाळू माफियांची चलती चालू आहे. त्याबद्दल कुणाची ओरडा असण्याची काहीच गरज नाही! मात्र अवैध होणारी वाहतूक, अवैध होणारी साठेबाजी याला जबाबदार कोण?? हा प्रश्न कोण सोडवणार? कारण सर्वच यासंदर्भात मळून आहेत की काय? असे वाटू लागले आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यास महसूल प्रशासनाचे पुढे आणि राजकारणातील भ्रष्ट व्यक्तीच्या पुढे गोरगरिबांचे काही चालत नाही. असे असले तरीही किमान लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे असे शाहूनगर भागातील लोक बोलून दाखवित आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा