Subscribe Us

header ads

तळेगाव सोसायटी आ.संदीपभैय्यांच्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 


तळेगाव सोसायटी आ.संदीपभैय्यांच्या ताब्यात


बीड: तालुक्यातील तळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीमध्ये आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.सध्या जिल्हाभरात सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूका सुरू आहेत.बीड तालुक्यातील तळेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीचीही निवडणूकही नुकतीच जाहीर झाली होती.यामध्ये आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.निवडून आलेले उमेदवार विष्णू घोलप यांची चेअरमनपदी, शहाजी बागलाने यांची व्हाइस चेअरमनपदी तर भगवान बागलाने,कर्ण काकडे, निलेश चव्हाण, सुखदेव महाकुंडे,राणोजी ढोरमारे, सुरेश शिंदे यांची सदस्यपदी तर अयोध्या घोलप व विद्या घोलप महीला प्रतिनिधी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.या निवडणूकीध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी सरपंच संदीपान ढोरमारे, रावसाहेब चौरे, नारायण ढोरमारे, भगवान बागलाने आदींनी विशेष परिश्रम घेतले.निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक