Subscribe Us

header ads

विद्यार्थ्यांनी सद्गुणी होऊन देशाची समाजाची सेवा करावी-श्री गोविंदराव वाघ साहेब

बीड स्पीड न्यूज 


विद्यार्थ्यांनी सद्गुणी होऊन देशाची समाजाची सेवा करावी-श्री गोविंदराव वाघ साहेब

बीड दि.३(प्रतिनिधी)-: आजच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मिळवावी त्या सोबतच सद्गुणी होऊन देशाची समाजाची सेवा करावी असे आवाहन शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री गोविंदराव वाघ साहेब यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना केले. या वेळी व्यासपीठावर श्री दत्तात्रय चव्हाण सर, श्री आत्माराम वाव्हळ सर,  पालक श्री बाबूराव पाखरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,  स्त्रियांचे उध्दारकर्ते महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्याबाई होळकर, यशवंतराव चव्हाण या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  संस्थेचे सचिव श्री गोविंदराव वाघ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री गोविंदराव वाघ साहेबांनी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाची माहिती सांगितली. महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यामागचे महत्व विशद केले. या वेळी बोलताना वाघ साहेब म्हणाले की, आजकाल विद्यार्थी खूप अभ्यास करून गुणवंत होत आहेत. अगदी शंभर टक्के मार्क मिळवत आहेत. शंभर टक्के गुण मिळवून गुणवान असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सद्गुणी असणे आवश्यक आहे. गुणवत्तेला सद्गुणांची जोड देऊन आई-वडिलां समवेत देशाची आणि समाजाची सेवा करावी असे आवाहन वाघ सरांनी केले.  वर्षभर अभ्यास करुन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्या बद्दल आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांचे  तोंडभरून कौतुक करत त्यांना  पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक  डी. बी. चव्हाण सर यांनी तर संचालन श्री आत्माराम वाव्हळ सर  यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती फाटे मॅडम, श्रीमती साळुंके मॅडम, श्रीमती सानप मॅडम, गुजर सर, तान्हाजी मोरे,वचिष्ट शिंदे, सचिन यादव, बाबाराम थोरात यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रक व खाऊ चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला  शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा