Subscribe Us

header ads

महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी; अभिवादन करताना;बाबासाहेब सराफ,सुनिल भाबरे, राजकुमार शेटे

बीड स्पीड न्यूज 

महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी;
अभिवादन करताना;बाबासाहेब सराफ,सुनिल भाबरे, राजकुमार शेटे

किल्ले धारूर/ प्रतिनिधी-:जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्य जनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, महान क्रांतिकारक, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. समाजात समानता न्याय बंधुता आदी मूल्ये रुजविण्यात महात्मा बसवेश्वर यांचे खूप मोठे योगदान आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी समानतेची,प्रेमाची, बंधुताची शिकवण दिली. सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांचे शिष्य होते. त्यामुळे त्यांची जयंती भारतात सर्वत्र शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळ आदी ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.शिवसेना तालूका सचिव बाबासाहेब सराफ,शिवसेना तालूका संघटन राजकुमार शेटे,शिवसेना उपशहर प्रमुख सुनिल भाबरे,बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ,, यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार, श्रीफळ अर्पण करून त्यांच्या कार्याचे, विचारांचे समरण करत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली.शाखा प्रमुख विशाल नडगिरे, दादा सुदामे, विजय सावंत, शरद सावंत, शंकर गांधले,अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा