Subscribe Us

header ads

कारखाना ऊस नेईना या नैराश्यातून शेतकऱ्याने शेतातील ऊसाला आग लावून गळफास घेऊन केली आत्महत्या!

बीड स्पीड न्यूज 


कारखाना ऊस नेईना या नैराश्यातून शेतकऱ्याने शेतातील ऊसाला आग लावून गळफास घेऊन केली आत्महत्या! 


मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- शेतकरी संघटनेचे नेते भाई मोहन गुंड 

गेवराई|प्रतिनिधी-: शेतातील ऊस घेऊन जाईना.या नैराश्यातून एका (35 वर्षीय) शेतकऱ्याने शेतातील उभ्या ऊसाला आग लावून दिली. यानंतर शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना गेवराई तालुक्यातील हिंगणगाव याठिकाणी आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. नामदेव आसाराम जाधव (वय 35 वर्षे) रा. हिंगणगाव ता. गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. तरी हजारो हेक्टरवरील ऊस अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात ऊभा आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट असून आपल्या शेतातील ऊस कारखाना नेईल की नाही ? म्हणून शेतकरी नैराश्येत आहे. यामधूनच गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी कारखान्याकडे वेळोवेळी ऊस घेऊन जाण्याबद्दल विनंती केली. मात्र अद्यापही ऊस तोडून न नेल्याने त्यांनी आज बुधवारी दुपारी शेतातील उभ्या ऊसाला नैराश्यातून आग लावली. यानंतर शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटने मुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली. 


मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- शेतकरी संघटनेचे नेते भाई मोहन गुंड 

तोंडावर आलेला असताना देखील काही शेतकऱ्यांचा ऊस शेतात ऊभा आहे. हि शासनाची मोठी नामुष्की आहे. तरी शेतातील ऊस अद्याप ऊभा असल्याकारणाने हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी नैराश्यातून आत्महत्या केली आहे. यास सर्वस्वी कारखानदार जबाबदार आहेत. तरी जाधव हे सभासद असलेल्या संबंधित कारखानदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा